शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सिडकोच्या भूखंडाचे टेकऑफ सुरूच; विक्रीचा धडाका कायम, नेरूळमधील भूखंडाला तीन लाखांचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 7:08 AM

रियल इस्टेट मार्केटच्या दृष्टीने हॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरूळ विभागातील सिडकोच्या भूखंडांच्या किमतींचे टेकऑफ सुरूच आहे.

नवी मुंबई :

रियल इस्टेट मार्केटच्या दृष्टीने हॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेरूळ विभागातील सिडकोच्या भूखंडांच्या किमतींचे टेकऑफ सुरूच आहे. या विभागातील भूखंडांना  विकासक आणि गुंतवणूकदारांची चांगलीच पसंती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवी मुंबईच्या विविध नोडमधील ७० भूखंडांची विक्री योजना जाहीर केली होती. त्यातील नेरूळमधील एक भूखंड प्रतिचौरस मीटर ३ लाख १८ हजार रुपये दराने विकला गेला आहे. त्यामुळे सिडकोचा उत्साह वाढला आहे. 

मागील दोन वर्षांपासून सिडकोने भूखंड विक्रीचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास भूखंड विक्रीच्या ३०  योजना राबविल्या आहेत. त्यातील  २८ आणि २९ क्रमांकाच्या योजनेतील भूखंडांसाठी बोली लावण्याची मुदत शिल्लक आहे. तर ३० क्रमांकाच्या योजनेतील मुदत गुरुवारी संपल्याने शुक्रवारी यातील भूखंडांसाठी ई-बोली लावली. 

यात नेरूळ सेक्टर १३ येथील १ हजार ३९२  चौरस मीटर क्षेत्रफळाचा  भूखंडाला प्रतिचौरस मीटर ३ लाख १८ हजार ५०१ रुपयांचा विक्रमी दर मिळाला. या भूखंडाचा सिडकोचा मूळ दर प्रतिचौरस मीटर १ लाख १७ हजार ३९३ रुपये इतका होता. 

त्याचप्रमाणे नेरूळ सेक्टर १३ मधीलच २ हजार ३३८ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ३ लाख ५ हजार ९९९ रुपये प्रतिचौरस मीटर दराने विकला गेला आहे. तर नेरूळ सेक्टर २३ येथील १ हजार ४४३ चाैरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८९ हजार ८१३ रुपये प्रतिचौरस मीटर दर मिळाला आहे. त्याशिवाय या योजनेअंतर्गत  विविध नोडमध्ये निवासी वापरासाठी उपलब्ध केलेल्या ४० ते १५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांनाही विक्रमी दर मिळाला आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात सिडकोने विविध नोडमध्ये वाणिज्य आणि निवासी वापराचे १४ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले होते. या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत २६० कोटींची भर पडली होती. 

६०० पेक्षा अधिक भूखंडांची विक्रीभूखंड विक्री हे सिडकोच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून  सिडकोने भूखंड विक्रीचा धडका लावला आहे. आतापर्यंत जाहीर केलेल्या ३० योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रफळांच्या सहाशेपेक्षा अधिक भूखंडांची विक्री केली आहे.  या भूखंडांना त्यांच्या आधारभूत किमतीपेक्षा तीन ते चार पट दराचे प्रस्ताव सिडकोला प्राप्त होत आहेत. त्यामुळे सिडकोचा उत्साह वाढला आहे.

टॅग्स :cidcoसिडको