इमारतींचे ७०० स्लॅब ५५५ दिवसांत पूर्ण करण्याचा सिडकोचा विक्रम, गृहनिर्माण क्षेत्रात घोडदौड

By कमलाकर कांबळे | Published: November 8, 2022 08:19 AM2022-11-08T08:19:01+5:302022-11-08T08:19:12+5:30

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृह बांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपलाच विक्रम मोडला आहे. 

CIDCO record to complete 700 slabs of buildings in 555 days | इमारतींचे ७०० स्लॅब ५५५ दिवसांत पूर्ण करण्याचा सिडकोचा विक्रम, गृहनिर्माण क्षेत्रात घोडदौड

इमारतींचे ७०० स्लॅब ५५५ दिवसांत पूर्ण करण्याचा सिडकोचा विक्रम, गृहनिर्माण क्षेत्रात घोडदौड

googlenewsNext

नवी मुंबई :

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृह बांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आता ७०० स्लॅबचे काम अवघ्या ५५५ दिवसांत पूर्ण करून आपलाच विक्रम मोडला आहे. 

स्लॅब टाकण्याचा दिवसाचा  सरासरी वेग १.२६ इतका आहे. त्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सिडकोने दिवसाला सरासरी १.०२ या वेगाने ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम  पूर्ण केले होते. सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजनेंतर्गत विविध टप्प्यांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल  आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. 

1. यापूर्वी मिशन- ९६ अंतर्गत प्रिकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बामणडोंगरी स्थानकाच्या परिसरात  केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. 
2. याच तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३१ आणि ३७ मध्ये उभारण्यात येत असलेल्या इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण केले. त्यानंतर आता  याच विभागात ५५५ दिवसांत ७०० स्लॅबचे काम पूर्ण केले आहे.  
3. प्रगत  तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागारांसह इतर संबंधित घटकांचे  अभिनंदन केले आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे  उद्दिष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. घरांचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न वेळेत आणि निर्धारित कालावधीत पूर्ण होण्यास मदत होईल.
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: CIDCO record to complete 700 slabs of buildings in 555 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको