शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

नागरिकांच्या असंतोषामुळे सिडकोने कारवाई थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2016 2:24 AM

सिडको व पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. परंतु मंगळवारी पोलिसांना पूर्वसूचना न देताच वडघरमधील तीन चाळींवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला

नवी मुंबई : सिडको व पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. परंतु मंगळवारी पोलिसांना पूर्वसूचना न देताच वडघरमधील तीन चाळींवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी रोडवर उतरून तीव्र विरोध केल्यामुळे सिडकोला ही कारवाई थांबवावी लागली. पनवेल तालुक्यामधील सिडकोच्या जमिनीवर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. काही ठिकाणी वीटभट्ट्या व काही ठिकाणी चाळींसह बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. विमानतळ परिसरामध्येही अतिक्रमण वाढले आहे. या परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे. यामुळे पोलिसांनी कारवाईविषयी रोडमॅप तयार केला आहे. सिडकोने कारवाईपूर्वी किमान चार दिवस पोलिसांना बंदोबस्तासाठी माहिती दिली पाहिजे. यानंतर पोलीस व सिडकोचे अधिकारी घटनास्थळी जावून पाहणी करतील. ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी जागा मोकळी करून देण्याचे आवाहन करतील. त्यानंतरही संबंधितांनी योग्य सहकार्य केले नाही तर बंदोबस्तामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल. पोलीस गरज पडल्यास जादा कर्मचारीही उपलब्ध करून देतील, असे परिमंडळ एकचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सिडको अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अनधिकृत कारवाईविषयी बंदोबस्ताचा रोड मॅप ठरलेला असतानाही सिडकोने १० मे रोजी त्याचे उल्लंघन केले. पोलिसांना वडघर परिसरातील वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी बंदोबस्ताची मागणी केली होती. येथील ८ वीटभट्ट्या, हॉटेल,सिमेंट आर्र्टिकल फॅक्टरीसह कार्यालय पाडण्यात आले. यानंतर अतिक्रमण विभागाला जवळच तीन चाळी निदर्शनास आल्या. या चाळीही पाडण्याचा निर्णय तत्काळ घेण्यात आला. पोलिसांना व ज्यांच्यावर कारवाई करणार त्यांनाही याची माहिती दिली नव्हती. कारवाई सुरू करताच परिसरातील ३०० पेक्षा जास्त नागरिक रस्त्यावर उतरून त्यांनी सिडकोच्या पथकास विरोध केला. माजी खासदार रामशेठ ठाकूर व इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांना माहिती दिली. राधा यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी उपआयुक्तांना पाचारण केले. उपआयुक्तांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परंतु सदर चाळीवरील कारवाई तत्काळ स्थगित करण्यात आली.