शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सिडकोने शैक्षणिक भूखंड घेतला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:49 AM

शिक्षण संस्थांना चपराक; अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

नवी मुंबई : घणसोली येथे शैक्षणिक उपक्रमासाठी सवलतीच्या दरात दिलेल्या भूखंडाच्या करारनाम्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी सिडकोने एका शैक्षणिक संस्थेला दिलेला भूखंड परत घेतला आहे. सिडकोच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अन्य शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले आहेत. सिडकोने जनोद्धार शिक्षण प्रसारक मंडळासोबतचा करारनामा रद्द करून सदर भूखंड पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेण्याची धडक कारवाई सोमवारी केली. सिडकोच्या या धडक कारवाईमुळे नवी मुंबईतील इतर शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत.सिडकोने जनोद्धार शिक्षण प्रसारक मंडळाला घणसोली येथे भूखंड क्र मांक-२४४ हा ३५१७ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठी ३ आॅगस्ट २00४ ला दिला होता. दरम्यानच्या काळात सिडकोच्या सामाजिक सेवा विभागाने केलेल्या पडताळणीत या ठिकाणी तळमजला अधिक सहा मजले, परंतु प्लॅस्टर न करता अर्धवट बांधलेल्या या इमारतीत ट्री हाउस नामक ही त्रयस्थ संस्था शाळा चालवित असल्याचे आढळून आले. तसेच अर्धवट बांधलेल्या या इमारतीला महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र देखील प्राप्त झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावून इमारतीचा वापर थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. तसा अहवाल महापालिकेने सिडकोच्या वसाहत विभागाला दिला होता. या आधारे सिडकोच्या वसाहत विभागाने एप्रिलमध्ये पाहणी करून अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून भूखंड रद्द करण्याची कारवाई का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस संस्थेला बजावली होती. त्यानंतरसुद्धा संबंधित त्रयस्थ संस्थेने इमारतीचा वापर सुरूच ठेवल्याने अखेर ४ मे २0१८ रोजी जनोद्धार शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेला भूखंडाचा करारनामा रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी, सुरक्षा रक्षक व परिसरातील साक्षीदारांच्या उपस्थितीत भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आल्याचे वसाहत अधिकारी (२) करण शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई