सिडकोतील दक्षता अधिकाऱ्याचे पद रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:40 PM2019-01-29T23:40:46+5:302019-01-29T23:41:08+5:30

तक्रारदारांची होतेय गैरसोय; सह व्यवस्थापकीय संचालकांकडे अतिरिक्त भार

CIDCO vigilance officer's post vacant | सिडकोतील दक्षता अधिकाऱ्याचे पद रिक्त

सिडकोतील दक्षता अधिकाऱ्याचे पद रिक्त

Next

नवी मुंबई : सिडकोतील मुख्य दक्षता अधिकाºयाचे पद मागील तीन महिन्यांपासून रिक्त आहे. अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे हे पद आहे. विनय कारगांवकर यांची बदली झाल्यानंतर या पदावर नवीन अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे सध्या या पदाचा अधिभार सह व्यवस्थापकीय संचालक शिनगारे यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे सिडकोची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. विशेषत: भूखंड घोटाळ्याची प्रकरणे तर विधिमंडळात गाजली आहेत. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी समिती गठीत केली; परंतु भ्रष्टाचाराला आळा घालण्यात सिडकोला यश आले नाही, त्यामुळे सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी सिडकोत स्वतंत्र दक्षता विभाग सुरू केला. सिडकोच्या पहिल्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून प्रज्ञा सरवदे यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर सिडकोच्या कारभाराला काही प्रमाणात शिस्त लागली आणि तक्रारीचा ओघ कमी झाला. प्रज्ञा सरोदे यांच्या बदलीनंतर विनय कारगांवकर यांची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक झाली; परंतु दोन महिन्यांपूर्वी त्यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे सध्या हे पद रिक्तच आहे. या पदाचा तात्पुरता कार्यभार सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांच्यावर सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे पद आयपीएस दर्जाचे असल्याने एखाद्या आयएएस दर्जाच्या अधिकाºयावर त्याचा भार सोपविणे कितपत संयुक्तिक आहे, असा सवाल सिडकोत उपस्थित केला जात आहे.

मुळात सिडकोत दक्षता विभाग सुरू करण्यास काही अधिकारी व कर्मचाºयांचा सुरुवातीपासून विरोध होता. त्यानंतरही तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी हा विभाग सुरू केला. त्यामुळे भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला; परंतु मागील दोन महिन्यांपासून या मुख्य दक्षता अधिकाºयाचे पदच रिक्त असल्याने भ्रष्ट प्रवृत्तींच्या हालचाली वाढल्या आहेत. भ्रष्टाचाराचे मुख्य स्रोत म्हणून ओळखल्या जाणाºया साडेबारा टक्के विभागात दलालांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे.

अधिकारी व कर्मचाºयांचे कार्यालयातील आणि बाहेरील हस्तक सक्रिय झाले आहेत. अशा परिस्थितीत तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल नागरिकांना पडला आहे. कारण साडेबारा टक्के विभाग सह व्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांच्याकडे आहे.
मुख्य दक्षता अधिकाºयांचा तात्पुरता पदभारसुद्धा त्यांच्यावरच सोपविण्यात आला आहे. दोन्ही विभाग त्यांच्याच अखत्यारित असल्याने तक्रारीला न्याय मिळेल का, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

Web Title: CIDCO vigilance officer's post vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.