शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सिडको काढणार ३,५०० घरांची सोडत? सर्वसामान्यांची वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 9:54 AM

पुढील चार वर्षांत उर्वरित ६७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई :सिडकोच्या नवीन घरांची सोडत नवीन वर्षात निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  २६ जानेवारीच्या मुहूर्तावर विविध नोडमधील साडेतीन हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबधित विभागाने घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासूनची सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी २५ हजार घरे बांधून त्यांचे यशस्वीरीत्या वाटप केले आहे. पुढील चार वर्षांत उर्वरित ६७ हजार घरे बांधण्याची सिडकोची योजना आहे. 

जवळपास साडेतीन हजार घरांची सोडत २६ जानेवारीला काढण्याची योजना संबंधित विभागाने तयार केल्याचे समजते. विशेष म्हणजे सिडकोने पंतप्रधान आवास योजनेतील घरांची शेवटची सोडत गेल्या दिवाळीमध्ये काढली होती. ही घरे खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसरात आहेत. 

घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय

खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या या प्रकल्पातील घरांच्या किमती अधिक असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. परंतु, मागील आठ महिन्यांपासून या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. परिणामी या योजनेतील यशस्वी अर्जदारांना घरांचे वाटपपत्र दिले गेलेले नाही. याच कारणास्तव मागील वर्षभरात सिडकोने घरांची नवीन योजना काढली नसल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी नवीन वर्षात साडेतीन हजार घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली. 

टॅग्स :cidcoसिडको