मुंबई : नवी मुंबईत सिडकोने येत्या काळात अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. दसºयापर्यंत तब्बल १५ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाºया सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.सिडको येत्या पाच वर्षात तब्बल ५२ हजार घरांची उभारणी करणार आहे. शिवाय यात पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे पूर्ण करण्यात येणार असून दसºयापर्यंत ही लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. खारघर, घणसोली, द्रोणगिरी आणि तळोजा या भागात या घरांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये तळोजा येथे सध्या १० हजार घरांची उभारणी करण्याचं काम सुरू आहे. या सर्व इमारती डिसेंबर २०१८ पर्यंत बांधून पूर्ण करण्यात येणार आहेत. या घरांच्या किंमतीही सर्वसामान्यांना परवडतील या दरातच असणार आहेत. मात्र अजून या किंमतीविषयी सिडकोकडून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र दसºयापर्यंत १५ हजार घरांची लॉटरी निघेल हे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबईत दसऱ्यापर्यंत सिडकोच्या १५ हजार घरांची लॉटरी निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:42 AM