सिडकोची ९०३ घरांची योजना, परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 08:45 AM2024-08-21T08:45:40+5:302024-08-21T08:45:47+5:30
या गृहसंकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे.
नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फ कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर ९०२ घरांची नवीन योजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट २०२४ रोली तिचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
या गृहनिर्माण योजनेंतर्गत कळंबोली, खारघर व घणसोली या नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता ३८ व सर्वसाधारण प्रवर्गाकरिता १७७ याप्रमाणे एकूण २१३ सदनिका तसेच सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील मिळून एकूण ६८१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
या गृहसंकुलांना रेल्वे, रस्ते, मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह सिडकोचे अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प या गृहसंकुलांपासून नजीकच्या अंतरावर आहेत. यामुळे नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळेल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.