अतिक्रमणावर सिडकोची कारवाई
By admin | Published: September 28, 2016 03:03 AM2016-09-28T03:03:51+5:302016-09-28T03:03:51+5:30
सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आहे. मंगळवारी तळोजा येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून तब्बल ५000 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा
नवी मुंबई : सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात पुन्हा कंबर कसली आहे. मंगळवारी तळोजा येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून तब्बल ५000 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. सोमवारी खारघर येथे अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली होती.
गेल्या आठवड्यात घणसोली येथील दोन बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी खांदा कॉलनीत कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले. मंगळवारी तळोजा येथे शाळा आणि उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. सिडकोचे मुख्य अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.