शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

आचारसंहितेपूर्वी सिडकोचा २५ हजार घरांचा बंपर धमाका! प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 1:05 PM

चार वर्षांत ६७ हजार घरे बांधणार.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  सिडकोने मागील सात  वर्षांत विविध घटकांसाठी २५ हजारांपेक्षा अधिक  घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षांत चार टप्प्यात आणखी ६७  हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यातील  ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. त्यापैकी  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी  २५ हजार घरे सिडको विक्रीस आणणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व घरे ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते. 

सिडको सध्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी विविध नोडमध्ये घरे बांधत आहे. सध्या तळोजा, वाशी, जुईनगर, खारघर, कामोठे, मानसरोवर, करंजाडे, कळंबोली आदी नोडमध्ये गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. 

सर्वाधिक म्हणजेच जवळपास २१ हजार घरे एकट्या तळोजा नोडमध्ये बांधली जात आहेत. असे  असले तरी मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी येथील घरे मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्राहकांना या प्रकल्पांतील घरांच्या योजनेची प्रतीक्षा आहे. आचारसंहितेपूर्वी प्रस्तावित केलेल्या गृहयोजनेत कोणत्या प्रकल्पांतील घरांचा समावेश करायचा, यासंदर्भात संबधित विभागाने चाचपणी सुरू केली आहे.

बुक माय सिडको होमविशेष म्हणजे या घरांसाठी ‘बुक माय सिडको होम’ अर्थात ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना आहे. याअंतर्गत  ग्राहकांना ‘प्रथम येणाऱ्यास  प्राधान्य’ या तत्त्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. या अंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असे. ही सर्व घरे संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत. यात घराचे क्षेत्रफळ, नकाशा तसेच किंमत आदीचा इत्यंभूत तपशील असेल. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर आरक्षित करता येईल.

आतापर्यंतची सर्वात मोठी गृहयोजनासिडकोच्या माध्यमातून आतापर्यंत विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधून त्यासाठी वेगवेगळ्या गृहयोजना जाहीर केल्या. २०१८ मध्ये  दोन टप्प्यात जवळपास १८ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आतापर्यंतची ती  सर्वात मोठी गृहयोजना ठरली होती. मात्र, आता सिडकोच्या इतिहासात २५ हजार घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर होत आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई