शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

स्थलांतरित ग्रामस्थांना मिळणार प्रोत्साहन भत्ता, सिडकोचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 1:13 AM

विमानतळबाधित दहा गावांतील जवळपास ९० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे.

नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गावांतील जवळपास ९० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. मात्र, उर्वरित दहा टक्के ग्रामस्थ अद्यापि प्रलंबित मागण्यांवर अडून आहेत. त्यांना स्थलांतरासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अनेक ग्रामस्थांनी स्थलांतर केलेले नाही. या पार्श्वभूमीवर स्थलांतराच्या प्रक्रियेला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या बांधकाम अनुदानात ५०० रुपयांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांनाही याचा लाभ दिला जाणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावांतील १,१६० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीच्या बदल्यात येथील ग्रामस्थांना भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी पुष्पकनगर या नव्या नोडची उभारणी करण्यात येत आहे. या नोडमध्ये अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सिडकोच्या आवाहनाला प्रतिसाद देत दहा गावांतील २,८०० कुटुंबांपैकी जवळपास २,७०० कुटुंबांनी आपली बांधकामे पाडून स्थलांतर केले आहे. उलवे, कोंबडभुजे, चिंचपाडा व गणेशपुरी आदी गावांत साधारण १०० कुटुंबांचे स्थलांतर होणे बाकी आहे. या ग्रामस्थांनी सिडकोने १५ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती. मात्र, या मुदतीतही स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला होता; परंतु कोणत्याही स्थितीत उर्वरित बांधकामे पाडून ग्रामस्थांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने स्थलांतरित होणाºया कुटुंबाला देण्यात येणाºया बांधकाम अनुदानात प्रतिचौरस फुटामागे ५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ पुनर्वसन पॅकेजमध्ये बांधकाम अनुदानाची रक्कम प्रतिचौरस फूटला १००० रुपये इतकी होती. आता त्यात ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढीव अनुदानाचा हा लाभ यापूर्वी स्थलांतर केलेल्या कुटुंबांनाही दिला जाणार असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.>वाघिवली ग्रामस्थांचे होणार नुकसानवाघिवली गावातील १०७ बांधकामधारकांनी आपले बांधकाम पाडून स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे. पुनर्वसन पॅकेजनुसार १००० रुपये बांधकाम अनुदान व ५०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता, तसेच १८ महिन्यांचे घरभाडे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थलांतर केलेल्या येथील बांधकामधारकांना अद्यापि भूखंडांचे वाटप करण्यात आले नव्हते. मात्र, सिडकोने आता १०० भूखंड तयार ठेवले असून लवकरच त्याचे वाटप केले जाणार आहे. तर वाघिवलीतील उर्वरित ६० ते ७० बांधकामांचे स्थलांतर न करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते. त्यामुळे या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.