सिडकोच्या स्नेहसंमेलनात अन्नातून विषबाधा, वाशीतला प्रकार, २५ जणांना उलट्यांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:25 AM2018-02-11T02:25:23+5:302018-02-11T02:25:37+5:30
सिडको कर्मचा-यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी जेवणातून २५ जणांना शुक्रवारी रात्री विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळात उलट्या व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, सिडकोकडून या संबंधीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आलेली नाही.
नवी मुंबई : सिडको कर्मचा-यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी जेवणातून २५ जणांना शुक्रवारी रात्री विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळात उलट्या व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, सिडकोकडून या संबंधीची तक्रार पोलिसांकडे करण्यात आलेली नाही.
शुक्रवारी रात्री वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सिडको कर्मचाºयांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते. यावेळी सिडको कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, निमंत्रित अशा सहा हजारापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. दिवसभर कार्यक्रम झाल्यानंतर रात्री सर्वांसाठी जेवण ठेवण्यात आले होते. या वेळी सुमारे २५ जणांना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना तत्काळ वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी नऊ जणांना प्रकृती सुधारल्याने शनिवारी रुग्णालयातून सोडण्यात आले असून, उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. अन्नातून बाधा झालेल्यांमध्ये काही सिडको कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या निमंत्रितांचा समावेश आहे. जेवणानंतर काही जणांना उलट्या होत असल्याचे पाहून बाकीच्यांमध्ये भीती निर्माण झाली होती; परंतु तेथे जेवलेल्या सहा हजार जणांपैकी अवघ्या २५ जणांना बाधा झाल्याने, त्यांच्या खाण्यात काही फरक पडला असावा, असा अंदाज आहे.
घडलेल्या प्रकाराची तक्रार सिडकोने पोलिसांकडे केलेली नाही. मात्र, वाशी पोलिसांनी विषबाधा झालेल्यांची चौकशी केली असून, नेमके काय खाल्ल्यानंतर त्यांना त्रास झाला असावा, याचा शोध घेत आहेत. त्याकरिता कॅटरिंग कर्मचाºयांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
- सिडको आर्टिस्ट कंबाईनतर्फे उन्मेष २०१८च्या माध्यमातून सिडको कर्मचारी व अधिकाºयासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला होता. या वेळी प्रसिद्ध गायक-गायिकांसह सिडकोच्या कर्मचाºयांनी गाणी सादर केली. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी, सिडकोमार्फत शहराची जडणघडण होताना त्यात अधिकारी व कर्मचाºयांसमवेत त्यांच्या कुटुंबीयांचेही योगदान असल्याचे सांगितले.