नवी मुंबई - सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेत अर्ज भरण्यासाठी शनिवारपर्यंतची अंतिम मुदत होती. परंतु सिडकोने ही मुदत आणखी एक महिना वाढविली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे अर्ज भरायचे राहून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संधी मिळणार आहे.दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे.२0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी २८ जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.२९ आॅगस्ट अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. ती मुदत शनिवारी संपुष्टात आली आहे. त्यामुळे सिडकोने ही मुदत आणखी एक महिना वाढविली आहे. मुदत वाढविल्याने १५ सप्टेंबर रोजी नियोेजित केलेली संगणकीय सोडत लांबणीवर पडली आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सिडकोच्या महागृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. खास पोलीस कर्मचाºयांसाठी असलेल्या ४,४६६ घरांपैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित ३,४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत.मुंबई महानगर क्षेत्रात सेवा बजावणाºया पोलीस कर्मचाºयांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सध्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक पोलिसांना इच्छा असूनही अर्ज करता येत नाही. त्यांची ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने अर्ज भरण्यासाठी मुदत दिल्याचे सिडकोने स्पष्ट केले.
सिडकोची गृहयोजना : गृह नोंदणीसाठीची मुदत महिनाभर वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 12:37 AM