आसुडगावजवळील सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्पही अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:26 AM2019-12-19T00:26:25+5:302019-12-19T00:26:43+5:30
ट्रक टर्मिनलवरील इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न : बांधकामाच्या वेळी पार्किंगचाही मोठा प्रश्न
कळंबोली : पंतप्रधान आवास योजनेला खांदेश्वर, मानसरोवर तसेच खांदा कॉलनीत जोरदार विरोध होत आहे. तसेच आसुडगाव येथील ट्रक टर्मिनल्सच्या वरती जे टॉवर बांधले जातील तेही सुरक्षित कसे राहतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याशिवाय जेव्हा काम सुरू होईल त्याप्रसंगी जड वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून, याविषयी सिडकोला निवेदनही दिले आहे.
नवी मुंबई तसेच पनवेल परिसरात सिडकोचे जितके बस टर्मिनल्स आहेत. तिथे खाली बस थांबे व वरती पंतप्रधान आवास योजनेच्या नावाने गरीब व गरजूंकरिता घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने अलीकडेच हे नियोजन केले आहे. त्याकरिता त्यांनी पहिल्या नियोजनामध्ये बदल केला आहे. इतर भूखंड विकण्यासाठी मिळावेत म्हणून त्यांच्याकडूनही धोरण हाती घेण्यात आल्याचा आरोप विविध सामाजिक संस्था करीत आहेत. खांदेश्वर, मानसरोवर आणि खांदा कॉलनीत येथील भूखंडावर अशा प्रकारे घरे बांधण्याकरिता तीव्र विरोध आणि नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रक टर्मिनल्ससाठी प्लॅन करण्यात आलेल्या जागेवरही अशाच प्रकारे इमारती बांधल्या जाणार आहेत. आसुडगाव एनएमएमटी आगारासमोर सिडकोची दोन भूखंडावर मोठी पार्किंग आहेत. त्या ठिकाणीही खाली वाहनतळ आणि वरती पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधली जाणार आहेत.
खांदा वसाहतीच्या आजूबाजूला मोठी हाउसिंग स्कीम राबविण्याचे सिडकोचे नियोजन आहे; परंतु ज्या कारणाकरिता ही जागा राखीव आहे, त्याला दुय्यम स्थान देत त्या जागेवर गृहनिर्माण करण्यात येत आहे. याबाबतही वेगवेगळ्या पद्धतीने विरोध होत आहे.
या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या वाहनतळावर उभे राहणारे ट्रक, ट्रेलर, डम्पर ही अवजड वाहने कुठे उभी राहणार, असा प्रश्न प्रभाग समिती ‘ड’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोचे एमडी व मुख्य नियोजनकाराला विचारला आहे. वाहने उभी करण्याकरिता पर्यायी व्यवस्था सिडकोने केली नाही. ती अगोदर करावी आणि मगच हा प्रकल्प हाती घ्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्यावर वाहने उभी राहण्याची शक्यता
च्ट्रक ट्रर्मिनल्सच्या जागेवर इमारतीचे काम हाती घेतल्यानंतर जेएनजीटी, स्टील मार्केट आणि इतर जाण्याकरिता येथे आलेल्या वाहनांना उभे राहण्याकरिता जागाच शिल्लक राहणार नाही.
च्मग ते कॉलनीतील रस्त्यावर उभे राहतील, यामुळे कोंडी, अपघात होतील याचा विचार सिडकोने केला नसल्याचे मत भाजपचे पदाधिकारी दशरथ म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
याला जबाबदार कोण?
च्भविष्यात वाहनतळ खाली झाले आणि वरती इमारती उभ्या राहिल्या. दुर्दैवाने एखादा रसायनच्या टँकरचा स्फोट झाला. किंवा इतर वाहनांना आग लागली, त्या वेळी इमारतीला धोका पोहोचणार नाही का? याला जबाबदार कोण असेल, असे प्रश्न
च्नवनाथ मेंगडे यांना पडले आहेत. सिडकोने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करून हा प्रकल्प उभारावा, असे मत खांदा कॉलनीतील रहिवासी रोहण व्हटकर यांनी व्यक्त केले.