शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

सिडकोची उदासीनता उलवेकरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:44 AM

सिडकोच्या उदासीन धोरणाचा फटका उलवे नोडमधील रहिवाशांना बसू लागला आहे. उघड्या गटारांमुळे अपघात होऊ लागले आहेत.

नामदेव मोरेनवी मुंबई : सिडकोच्या उदासीन धोरणाचा फटका उलवे नोडमधील रहिवाशांना बसू लागला आहे. उघड्या गटारांमुळे अपघात होऊ लागले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने सिडकोकडून फसवणूक झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.राज्य शासनाने ठाणे, उरण व पनवेल तालुक्यांमधील जमीन संपादित करून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला. शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने नवी मुंबई महापालिका व पनवेल तालुक्यातील नोडचा विकास केला व तिसºया टप्प्यात उरण तालुक्याला प्राधान्य दिले व उलवे नोड विकसित करण्यास सुरुवात केली. या परिसरामधील विकासाला चालना देण्यासाठी उन्नती गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला व २०१२मध्ये नागरिकांना घरांचे वितरण केले. याशिवाय खासगी विकासकांनी शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू केले. सद्यस्थितीमध्ये १९, २०, २१ सेक्टरचा विकास झपाट्याने सुरू आहे. अनेक ठिकाणी नागरिक राहण्यासाठीही आले आहेत; परंतु येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. सिडकोकडून मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी मलनि:सारणाचे पाणी रोडवरून वाहत असून, प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. रोडवरील गटारांवर झाकणे बसविलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी गरोदर महिला गटारात पडल्याची घटना घडली होती. लहान मुलगाही येथील गटारात पडला होता. नागरिकांनी तक्रारी करूनही काहीच दखल घेतली नसल्याने त्याच गटारात पडून एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. पूर्ण उलवे नोडमध्ये गटारांची स्थिती गंभीर असून, अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.उलवे नोडमधील रस्त्याची स्थिती गंभीर आहे. मुख्य रस्त्याची स्थिती ठीक असली, तरी अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे अशक्य होऊ लागले असून, वारंवार अपघात होऊ लागले आहेत. पथदिवेही बसविण्यात आलेले नाहीत. गटारांची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. गटारांची साफसफाई केली जात नसल्याने पाणी रोडवरून वाहू लागले आहे. नोडमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उलवेमध्ये राहण्यासाठी गेलेले नागरिक नोकरीसाठी मुंबई, ठाणे व इतर परिसरामध्ये जात असून, त्यांच्यासाठी वाहतुकीची काहीही साधने नाहीत. एनएमएमटीची बस वेळेत येत नसून, रेल्वे प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. शाळा, रुग्णालय व इतर सर्वच प्रश्न गंभीर झाले आहेत.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही. एनएमएमटी वेळेत येत नाही. रेल्वे प्रकल्प रखडला आहे. उलवेमधून नवी मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा सुविधाच नाहीत.- प्रकाश गोगावले, रहिवासी, उलवेसेक्टर २१ मधील गटारात पावसाळ्यात एक मुलगा पडला होता. काही दिवसांपूर्वी गरोदर महिलाही गटारात पडली होती. मंगळवारी गटारात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे.- मंजुळा तळे,सामाजिक कार्यकर्त्या सेक्टर २१उलवे नोडमधील मलनि:सारण वाहिन्यांचे काम रखडले आहे. डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.- श्रीराग कमलासनन,उपाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षसिडकोने उलवे नोडमधील समस्या सोडविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नोडचा विकास धीम्या गतीने सुरू आहे. रोड, गटार, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.- कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्तेउलवे नोडमध्ये परवडणारी घरे उपलब्ध असल्याने चार वर्षांपासून अनेकांनी घरे खरेदी केली आहेत; परंतु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरे बंद ठेवावी लागली आहेत. सिडको प्रशासन नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. अजून किती दिवस गैरसोयी सहन करायच्या?- राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते