शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शेकापचा पनवेलमधील बालेकिल्ला ढासळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:50 PM

सलग पराभव : विधानसभा निवडणुकांमध्ये लागणार कस

- वैभव गायकर

पनवेल : एकेकाळी पनवेलमध्ये केवळ शेतकरी कामगार पक्षाचा वरचष्मा होता. मात्र, मागील दशकापासून ही परिस्थिती बदलत चालली आहे. सलग दोन वेळा विधानसभा त्यानंतर महानगरपालिका आणि आता लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांनी खालेला सपाटून मार पाहता, शेकापचा पनवेलमधील बालेकिल्ला ढासळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मावळ मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार रिंगणात उतरल्यामुळे मावळच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. मतदारांनी श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य देऊन पसंती दिली. २०१४ मध्ये शेकापला पनवेलमधून तब्बल १४ हजारांची लीड पनवेलकरांनी दिली होती. त्या वेळची मोदीलाटही प्रचंड होती. मात्र, १४ हजारांची लीड तोडून आता युतीला तब्बल ५४ हजारांची ऐतिहासिक लीड मिळाली आहे.

शेकापला आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या मतांचा फटका कधीच बसला नव्हता. पनवेलमधील ग्रामीण भागात शेकापची पकड मजबूत असली मात्र, शहरी मतदारांनी शेकाप आघाडीला नाकारले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतदेखील असेच चित्र पाहावयास मिळाले होते.

मावळ मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असलेल्या कर्जतमध्ये जेमतेम पार्थ यांना दोन हजारांचे मताधिक्य मिळाले, तर शिवसेनेचा आमदार असलेल्या उरण मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित ताकदीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना केवळ तीन हजारांचे मताधिक्य मिळाले. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मागणीनुसार पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पनवेलमधील मतांच्या समीकरणात अचानकपणे झालेला बदल पाहता शेकापगोठात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.शरद पवारांच्या सभेचा परिणाम नाहीपार्थ यांच्या प्रचारार्थ पनवेलमधील खारघर शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली होती. मात्र, या सभेचाही कोणताच परिणाम मतदारांवर झाला नाही, उलट पनवेलमधील ४४ हजारांच्या आघाडीत तब्बल १६ हजारांची आघाडी बारणे यांना खारघर शहरातून मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेकापचा कसलागणार आहे.

टॅग्स :maval-pcमावळ