पाण्यासाठी नागरिक आक्रमक

By admin | Published: January 6, 2016 01:11 AM2016-01-06T01:11:10+5:302016-01-06T01:11:10+5:30

रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने सतत केलेले दुर्लक्ष, मृतरूप झालेल्या पाणीपुरवठा योजना, या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा

Citizens aggressive to water | पाण्यासाठी नागरिक आक्रमक

पाण्यासाठी नागरिक आक्रमक

Next

पेण : रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने सतत केलेले दुर्लक्ष, मृतरूप झालेल्या पाणीपुरवठा योजना, या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा झालेला खर्च, पेण पाणीटंचाई कृतीआराखड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरची उधळपट्टी या साऱ्या प्रतिबंधक उपाययोजनाच तकलादू ठरल्याने पेण शिर्की, मसद खारेपाटातील २४ गावे, वाडीवस्त्यांवर पाण्याची टंचाई गेली १५ ते २० वर्षे सुरू आहे. यावर उपाययोजना करावी, अशा मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी पेण प्रांत कार्यालयावर धडक दिली.
जीवनावश्यक मूलभूत गरजा पुरविणाऱ्या यंत्रणाच नापास झाल्याने पाण्यासाठी अहोरात्र पायपीट करणारा महिलावर्ग संतप्त होऊन शिर्की पंचक्रोशी चळवळीच्या माध्यमातून संघटनात्मक एकजुटीने मंगळवारी पेण प्रांत कार्यालयावर ६०० ते ७०० पुरुष, महिलांनी पाणी आमच्या हक्काचे, ते मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत पेण प्रांत कार्यालयावर धडक दिली. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन प्रत्येकाने आपली मनोगते व्यक्त करून प्रांताधिकारी निधी चौधरी यांना पाणी, रस्ते व खारभूमी बंधारे बळकटीकरण याबाबतचे निवेदन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिले.
पेण खारेपाटाला पाणीटंचाईची झळ गेली दोन दशके बसत आहे. उदासीन शासनकर्ते पाणी असूनही त्या पाण्याचे योग्य नियोजन व नियोजनाद्वारे ही पाणीपुरवठा योजनेत कसे आणता येईल, याबाबत नियोजनशून्य कारभार व राजकीय अनास्थेपोटी हा ज्वलंत विषय खारेपाटातील महिलांच्या मनात सतत असंतोषाचा लाव्हा खदखदत आहे. निवडणुका येतात अन् जातात, मात्र हा प्रश्न कायमच अधांतरी आहे. रायगडात टंचाईसदृश गावांमध्ये पेण खारेपाटाचा पहिला नंबर लागतो.
या टंचाईसदृश गावामध्ये दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती यावेळी नागरिकांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Citizens aggressive to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.