शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

पाण्यासाठी नागरिक आक्रमक

By admin | Published: January 06, 2016 1:11 AM

रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने सतत केलेले दुर्लक्ष, मृतरूप झालेल्या पाणीपुरवठा योजना, या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा

पेण : रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने सतत केलेले दुर्लक्ष, मृतरूप झालेल्या पाणीपुरवठा योजना, या योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी अव्वाच्या सव्वा झालेला खर्च, पेण पाणीटंचाई कृतीआराखड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरची उधळपट्टी या साऱ्या प्रतिबंधक उपाययोजनाच तकलादू ठरल्याने पेण शिर्की, मसद खारेपाटातील २४ गावे, वाडीवस्त्यांवर पाण्याची टंचाई गेली १५ ते २० वर्षे सुरू आहे. यावर उपाययोजना करावी, अशा मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी पेण प्रांत कार्यालयावर धडक दिली.जीवनावश्यक मूलभूत गरजा पुरविणाऱ्या यंत्रणाच नापास झाल्याने पाण्यासाठी अहोरात्र पायपीट करणारा महिलावर्ग संतप्त होऊन शिर्की पंचक्रोशी चळवळीच्या माध्यमातून संघटनात्मक एकजुटीने मंगळवारी पेण प्रांत कार्यालयावर ६०० ते ७०० पुरुष, महिलांनी पाणी आमच्या हक्काचे, ते मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत पेण प्रांत कार्यालयावर धडक दिली. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन प्रत्येकाने आपली मनोगते व्यक्त करून प्रांताधिकारी निधी चौधरी यांना पाणी, रस्ते व खारभूमी बंधारे बळकटीकरण याबाबतचे निवेदन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिले. पेण खारेपाटाला पाणीटंचाईची झळ गेली दोन दशके बसत आहे. उदासीन शासनकर्ते पाणी असूनही त्या पाण्याचे योग्य नियोजन व नियोजनाद्वारे ही पाणीपुरवठा योजनेत कसे आणता येईल, याबाबत नियोजनशून्य कारभार व राजकीय अनास्थेपोटी हा ज्वलंत विषय खारेपाटातील महिलांच्या मनात सतत असंतोषाचा लाव्हा खदखदत आहे. निवडणुका येतात अन् जातात, मात्र हा प्रश्न कायमच अधांतरी आहे. रायगडात टंचाईसदृश गावांमध्ये पेण खारेपाटाचा पहिला नंबर लागतो. या टंचाईसदृश गावामध्ये दरवर्षी ही परिस्थिती उद्भवत असल्याची माहिती यावेळी नागरिकांनी दिली. (वार्ताहर)