विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:25 PM2019-05-19T23:25:09+5:302019-05-19T23:25:13+5:30

आगीच्या घटनांत वाढ : महावितरणचे दुर्लक्ष

Citizens are scared for electricity hiding | विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

Next

नवी मुंबई : शहरातील अनेक भागात ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, काही ठिकाणी केबल्सना आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत.


नवी मुंबईकरांवर महावितरणच्या भारनियमनाचे संकट नसले तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. कोपरखैरणे व घणसोली परिसरात असे प्रकार सातत्याने घडत आहेत. मागील काही दिवसांपासून कोपरखैरणे गाव व लगतच्या परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्री अपरात्री बत्ती गुल होत असल्याने ऐन गरमीत नागरिकांचे हाल होत आहेत. अशाच प्रकारातून गतवर्षी नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला मध्यरात्रीच्या सुमारास घेराव घातला होता.

यंदा पुन्हा विजेचा लपंडाव सुरू झाल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे घणसोलीतही काही दिवसांपासून महावितरणची बत्ती गुल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी घणसोली गावापुरता मर्यादित असलेला विजेचा लपंडाव कॉलनी परिसरात देखील सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डी-मार्ट मॉललगत एका ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे खोदकामा वेळी महावितरणची वायर तुटली. त्यामुळे संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर शनिवारी दुपारी घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्गालगतच्या पदपथावरून नेलेल्या विद्युत वायरीमध्ये शॉर्टसर्किट झाले.


महावितरणकडून वेळी अवेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या कामकाजावर होत आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अनेक छोटे-मोठे आयटी उद्योग चालत आहेत. तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित संगणकीय खासगी तसेच व्यावसायिक कामे घरोघरी चालत आहेत.


अशावेळी विजेचा लपंडाव झाल्यास सुरू असलेल्या तंत्रज्ञानात देखील बिघाडाच्या शक्यतेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे अनपेक्षित दुर्घटना वगळता इतर वेळी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी वीज ग्राहकांना महावितरणकडे नोंद असलेल्या मोबाइलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Citizens are scared for electricity hiding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.