नवी मुंबई : शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्याने चालताना अचानक अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांची पादचाºयांनी धास्ती घेतली आहे. मागील तीन महिन्यात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या सुमारे जवळपास शंभर घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनमानसात भटक्या कुत्र्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या टोळीचा धसका दुचाकीस्वारांनी घेतला आहे. एकूणच या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेच्या संबंधित यंत्रणेला सपशेल अपयश आल्याचे दिसून आले आहे.गाव-गावठाणांसह शहरी भागातही भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी तर या कुत्र्यांमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या श्वान नियंत्रण पथकाने दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर या आठ विभागात एप्रिल २0१७ ते मार्च २0१८ या कालावधीत नवी मुंबईच्या विविध भागातून ४१६३ कुत्री पकडली. त्यापैकी ३२२४ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली, तर उर्वरित जखमी आणि रोगट कुत्र्यांवर उपचार करून सोडून देण्यात आले.मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांचा चावा घेतला आहे. विशेष म्हणजे कुत्रे चावल्यानंतर त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णांना धावपळ करावी लागते. कारण महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस नसल्याने रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा अधार घ्यावा लागतो आहे. महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचाराची सुविधा असली तरी दिघा किंवा एमआयडीसी परिसरातील रुग्णांना तेथपर्यंत जाणे गैरसोयीचे वाटते. त्यामुळे खासगी रुग्णालयाशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहत नाही. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याप्रकाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. रात्रभर गोंगाट करणाºया कुत्र्यांची टोळकी तसेच चावºया कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांनी घेतली भटक्या कुत्र्यांची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:16 AM