ई-टॉयलेटचा नागरिकांनी घेतला धसका

By admin | Published: February 12, 2017 03:19 AM2017-02-12T03:19:58+5:302017-02-12T03:19:58+5:30

स्वच्छ शहर अभियानांतर्गत महापालिकेने शहराच्या विविध भागात ई-टॉयलेट उभारले आहेत; परंतु अनेकदा यात तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे नागरिक टॉयलेटमध्ये

Citizens of e-toilet will be taken | ई-टॉयलेटचा नागरिकांनी घेतला धसका

ई-टॉयलेटचा नागरिकांनी घेतला धसका

Next

- विजय आहिरे,  नवी मुंबर्ई
स्वच्छ शहर अभियानांतर्गत महापालिकेने शहराच्या विविध भागात ई-टॉयलेट उभारले आहेत; परंतु अनेकदा यात तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे नागरिक टॉयलेटमध्ये अडकण्याचे प्रकार घडत आहेत. वाशीच्या मिनी सी-शोअरवर अलीकडेच घडलेल्या एका प्रकारात आत अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यासाठी चक्क अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. या प्रकारामुळे नागरिकांनी या टॉयलेटचा चांगलाच धसका घेतला आहे.
स्वच्छ शहर अभियानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सज्ज झाले असून त्यानुसार हागणदारीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने जोरदार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी ई-टॉयलेट व शी टॉयलेट उभारण्यात आले आहेत. वाशी विभागात दोन, पामबीच मार्गावर चार ई-टॉयलेट आणि वाशी डेपोत महिलांसाठी एक शी टॉयलेट उभारण्यात आले आहे. हे टॉयलेट उभारण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या देखभालीची जबाबदारीही याच कंपनीवर टाकण्यात आली आहे, असे असले तरी अनेक ठिकाणी या ई-टॉयलेटमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे दिसून आले आहे.
वाशीच्या मिनी सी-शोअर येथे विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी व सायंकाळी हा परिसर गजबजलेला असतो. नागरिकांच्या सुविधांसाठी महापालिकेने या ठिकाणी ओपन जिमसुद्धा सुरू केली आहे. तसेच येथील राजीव गांधी जॉगर्स पार्कच्या दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ ई-टॉयलेटची (एमआय टॉयलेट) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या टॉयलेटमध्ये एक नागरिक अडकल्याची घटना घडली होती. या टॉयलेटमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी पिवळे बटण आहे; परंतु हे बटण दाबूनही टॉयलेटचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सदर नागरिकाने मोबाइलवरून आपल्या मित्राशी संपर्क साधला व सुटका करून घेतली. अशाच एका प्रकारात आत अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यासाठी चक्क अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले होते. अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी या टॉयलेटच्या वापराचा धसका घेतल्याचे दिसून येते.

आपतकालीन परिस्थितीत पिवळे बटण दाबावे, अशा स्पष्ट सूचना ई-टॉयलेटच्या दर्शनी भागात देण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक या सूचनांचे पालन करण्याऐवजी तोडफोड करत आहेत. अनेक वेळा तांत्रिक बिघाडामुळे अशा घटना घडतात.
- हेमंत पावरा,
शाखा अभियंता,
सी-विभाग, वाशी.

Web Title: Citizens of e-toilet will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.