पाणीटंचाईवर नागरिकांच्या सूचना

By Admin | Published: February 5, 2016 02:52 AM2016-02-05T02:52:55+5:302016-02-05T02:52:55+5:30

नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत

Citizens' notice on water shortage | पाणीटंचाईवर नागरिकांच्या सूचना

पाणीटंचाईवर नागरिकांच्या सूचना

googlenewsNext

पनवेल : नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईवर विचारविनिमय करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या वतीने गुरूवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पनवेलकरांनी विविध उपाययोजना सुचविल्या. त्याचबरोबर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सांगोपांग चर्चा पाणी परिषदेत करण्यात आली. नागरिकांच्या सूचना विचारात घेण्यात येतील अशी ग्वाही पालिकेच्या वतीने देण्यात आली.
नगराध्यक्षा चारूशीला घरत, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, मुख्याधिकारी मंगेश चितळे, उपनगराध्यक्ष मदन कोळी आदी उपस्थित होते. सध्या वितरीत होत असलेले पाणी नागरिकांनी जपून वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेने नियोजन केले आहे. त्यासाठी आतापर्यंत सात बैठका झाल्या असून पाण्याचे न्याय्य वाटप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
मुख्याधिकारी मंगेश चितळे म्हणाले की, पनवेल शहराला प्रतिदिन देहरंग धरणातून ११ एमएलडी, एमजेपी कडून ९ एमएलडी, एमआयडीसी कडून ७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र जुन्या पाइपलाइनमुळे पाइप लाइन फुटते त्या दुरूस्तीसाठी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे शहराच्या काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. धरणात पाणी मुळातच पाणी कमी असून १३१ दिवस पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्याकरिता पालिकेने नियोजन केले असून एसटीपी प्लॅन्ट सुरू केला आहे. हे प्रक्रि यायुक्त पाणी वापरास उपयोगात आणले तर पाण्याची मोठी बचत होईल. हा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी योजनांमध्ये अमृत योजनेअंतर्गत कोटी रूपये निधी मंजूर झाला असल्याचे चितळे यांनी सांगितले. तात्पुरत्या योजनेत जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविणे, विहिरीचा वापर, टँकर फिलिंग सेंटर, एसटीपी प्लॅन्टच्या पाण्याचा वापर असे उपाय योजण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. पाणीटंचाईसंबंधी आयोजित या परिषदेत पंढरीनाथ दळवी, रोहिणी लिमये, अरु ण भिसे , लक्ष्मी बातम व इतर अनेक नागरिकांनी सूचना केल्या. (वार्ताहर)

Web Title: Citizens' notice on water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.