ई-बाइक प्रणालीला नागरिकांची पसंती; २० दिवसांत ९ हजार २०० फेऱ्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:45 PM2019-07-23T23:45:50+5:302019-07-24T07:02:13+5:30
नियम न मोडण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
नवी मुंबई : शहरात वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी, कमी अंतरावर ये-जा करण्यासाठी नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर न करता सायकलने प्रवास करावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या सहकार्याने जनसायकल सहभाग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून ४ जुलै रोजी ई-बाइकचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेला देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. ई-बाइक वापरासाठी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले असून नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबई हे पर्यावरणशील शहर म्हणून विकास होण्याच्या दृष्टीने वाहतूक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारखे प्रदूषणमुक्त वाहन वापराला प्राधान्य देणारी जनसायकल प्रणाली महापालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. त्यानंतर ४ जुलैपासून शहरात इलेक्ट्रिकल बाइक सुविधा सुरू करण्यात आली आहे. ई-बाइक वापरासाठी दहा स्टॅण्ड बनविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात सुमारे ८० ई-बाइक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ई-बाइक वापरासाठी प्रत्येक दहा मिनिटांना दहा रुपये असा दर असून नागरिक आणि तरुणाई ई-बाइक प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. ई बाइक प्रणालीचे उद्घाटन झाल्यापासून गेल्या २0 दिवसात जवळपास ९ हजार २00 फेºया पूर्ण झाल्या आहेत. नागरिकांच्या आणि ई बाइकच्या सुरक्षेच्या दृष्टीने ई बाइक वापरासाठी नियमावली आखून देण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने ई बाइक वापरणाºया व्यक्तीच्या वयाची १६ वर्षे पूर्ण असावीत तसेच डबल सीट बसू नये अशा नियमांचा समावेश आहे. ई बाइक प्रणाली सुरू झाल्यापासून २0 ते २२ नागरिकांनी डबल सीट प्रवास केला असून १६ वर्षांखालील ३ लहान मुलांनी ई बाइकचा वापर केला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पोलिसात तक्रार देखील करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर यापुढे १0 हजार रु पये दंड वसूल केला जाणार असून ई बाइक वापरताना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.