नवी मुंबई : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय, हवे ते उत्पादन पसंत करा अन् तुमच्या दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटा. त्यासाठी ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या उपक्रमास शहरातील नेरूळ, जुईनगर, पामबीच रोड येथे तुफान प्रतिसाद मिळाला. ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ शिका आॅनलाइन शॉपिंग सहजपणे, हा फंडा घेऊन आलेल्या उपक्रमास शहरात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात पूर्वीपासून ज्यांच्याकडे अॅप आहे, अशांवरही बक्षिसांची बरसात केलेली आहे. तसेच खेळात सहभागी होऊन तीन हजार रुपये किमतीचे गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. ‘अॅमेझॉन साधी गोष्ट’ या जनजागृतीच्या उपक्रमात युवक-युवतींनी गर्दी केलीे. अनेकांनी स्मार्ट फोनवर ‘अॅमेझॉन अॅप’ डाउनलोड केले आहे.
तुम्ही अनेक कार्ड्समधून निवड करून समान मासिक हप्त्यांमध्ये तुमची आॅर्डर पे करू शकता. त्यात विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादनांसाठी एकाच जागी निवडीची संधी पाहून नवीन ग्राहकही भारावले आहेत. यासाठी ग्राहकांना ‘अॅप’ डाउनलोड करण्यासाठी निवेदकांनी हसत-खेळत आपल्या खास शैलीतून मनोरंजन केले.अॅमेझॉनवर खरेदी करणे १, २, ३ करण्याइतके सोपे आहे१) अॅमेझॉन अॅप डाउनलोड करा२) आपला क्रमांक / ई-मेल पत्त्याद्वारे साइन-इन करा.३) आपल्याला हवे ते सर्व मिळवा, आपल्या बजेटमध्ये.कॅश आॅन डिलिव्हरी : तुमची आॅर्डर द्या आणि आॅर्डर आल्यावर पैसे द्या. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. ‘कॅश आॅन डिलिव्हरी’साठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे देऊ शकता.