महापालिकेच्या ई-तक्रार प्रणालीला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:35 AM2019-04-23T01:35:21+5:302019-04-23T01:35:28+5:30
अडीच वर्षांत २० हजार तक्रारी; प्रशासन दखल घेत असल्याने नागरिकांनीही व्यक्त केले समाधान
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून ई-कनेक्ट सेवा सुरू करण्यात आली आहे. अडीच वर्षांत या माध्यमातून २० हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्र ार दाखल झाल्यावर काही दिवसांतच निवारणामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
शहरात स्वच्छता अभियान राबविताना या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग असावा, तसेच नागरिकांना शहरात जाणवणाऱ्या विविध समस्याही सुटाव्यात यासाठी महापालिकेने सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेची वेबसाइट आणि एनएमएमसी ई-कनेक्ट नावाचे एक अॅप तयार केले होते. याद्वारे शहरातील नागरिकांनी डेब्रिज, फेरीवाले, कचरा, रस्ते, पदपथ, विद्युत व्यवस्था, मलवाहिन्या, उद्याने, स्मशानभूमी, तलाव, पाणी, स्वच्छता, अतिक्र मण, नालेसफाई, वृक्ष छाटणी आदी सुमारे २० हजारांहून अधिक तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत.
तक्र ार प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयाने ती २४ तासांत पाहिली नाही अथवा त्यावर सात दिवसांत उत्तर दिले नाही तर या प्रणालीतील स्वयंचलित यंत्रणेद्वारे ती तक्रार उच्च अधिकाºयाकडे पाठवली जाते. ठरवून दिलेल्या वेळेत या तक्रारींचे निवारण झाले नाही तर त्याविषयी संपूर्ण शहानिशा करून अधिकाऱ्यांना स्वयंचलित यंत्रणेद्वारे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येते.
या यंत्रणेद्वारे चालणाºया सर्व कामकाजाचा आढावा पालिका आयुक्त घेत असल्याने पहिल्याच टप्प्यात तक्रारींचे निवारण होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण काळात बनविण्यात आलेल्या या प्रणालीला फक्त सर्वेक्षणापुरते मर्यादित ठेवण्यात आलेले नाही. तर सातत्याने गेल्या अडीच वर्षांपासून प्रक्रि या सुरू आहे. नागरिकांनी तक्र ारी दाखल केल्यावर काही दिवसांत शक्य असल्यास काही तासांत या तक्र ारी सोडविल्या जात असून, नागरिकांचे समाधानकारक उत्तर येईपर्यंत कार्यवाही करण्यात येते. नागरिकांनी केलेल्या तक्र ारींवर महापालिका तत्काळ कार्यवाही करीत असल्याने नागरिकही समाधान व्यक्त करीत आहेत. यावर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महापालिकेला नागरिकांचा सहभाग या प्रकारात नामांकन मिळाले होते, हादेखील याच प्रणालीचा एक भाग असून या प्रणालीद्वारे वर्षभर नागरिकांचा सहभाग महापालिकेला लाभत आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील विविध लहान-मोठ्या समस्यांच्या तक्र ारी महापालिकेला प्राप्त होतात. सर्वच तक्र ारींवर वैयक्तिक लक्ष आहे. दर आठवड्याला होणाºया उच्च अधिकाºयांच्या बैठकीत न सुटलेल्या तक्र ारींबाबत चर्चा करण्यात येते. ठरवून दिलेल्या वेळेत तक्र ार न सुटल्यास स्वयंचलित यंत्रणेद्वारे उच्च अधिकाºयाकडे वर्ग होतात, त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयाकडून पहिल्याच टप्प्यात तक्र ारी सोडविण्यात येत आहेत.
- डॉ. रामास्वामी एन., महापालिका आयुक्त