पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील चिघळलेल्या पाणीप्रश्नावरून नागरिकांनी शनिवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. दोन दिवसांपूर्वी सेनेनेदेखील पाणीप्रश्नावरून पालिकेवर मोर्चा काढला होता. खारघर, कळंबोली, कामोठे तसेच पनवेलमधील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, हे पाणीही रहिवाशांना वेळेत उपलब्ध होत नाही. पालिकेकडे पाण्याचा मुबलक साठा असूनदेखील पालिका प्रशासन नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप या वेळी मोर्चेकऱ्यांनी केला.पनवेलच्या पाणीप्रश्नावर पनवेल संघर्ष समितीने पुढाकार घेऊन हे जनआंदोलन उभारले होते.शिवाजी चौकातून सुरू झालेला मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकला. मोर्चेकरांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतली. त्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली.मोर्चात संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, प्रथमेश सोमण, डॉ. भक्तिकुमार दवे, प्राचार्य बी. ए. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, सुभाष गायकवाड, मनोज शिरबंद्रे, नीलेश चव्हाण, संध्या शिरबंद्रे, दमयंतीम्हात्रे, सुधीर मोरे, महेंद्र विचारे, समीर कदम, उज्ज्वल पाटील, मंगलभारवाड, जितेश शिसवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मोर्चाच्या दरम्यान पालिका मुख्यालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.>टँकरवर पालिकेचे नावपनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी, आठ दिवसांत शहरात पाण्याचा दाब वाढविण्यास येईल, असे स्पष्ट केले. तसेच पालिकेच्या टँकर धोरणाची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली.महापालिकेने नवीन टँकर धोरण ठरविले असून, प्रत्येक टँकरवर पालिकेचे नाव असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पाणीप्रश्नावरून नागरिकांचा पनवेल पालिकेवर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:41 AM