शहरवासीयांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, ४४ डॉक्टर्स उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:16 AM2018-07-18T03:16:28+5:302018-07-18T03:16:31+5:30

महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विशेष लक्ष दिले आहे.

City doctors will get quality healthcare, 44 doctors will be available | शहरवासीयांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, ४४ डॉक्टर्स उपलब्ध होणार

शहरवासीयांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, ४४ डॉक्टर्स उपलब्ध होणार

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली येथील सार्वजनिक रु ग्णालय तसेच बेलापूर येथील माता बाल रुग्णालय याठिकाणी कॉलेज आॅफ फिजिशियन आॅफ सर्जन आॅफ मुंबई यांच्यामार्फत डॉक्टर्स उपलब्ध होणार असून याद्वारे नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सेक्टर १0 वाशी येथे एकमेव प्रथम संदर्भ रुग्णालय असून, त्याठिकाणी महानगरपालिका क्षेत्राप्रमाणेच पनवेल, उरण, मानखुर्द अशा बाहेरील भागातील रु ग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. त्याठिकाणी डॉक्टर्सची कमतरता असल्यामुळे प्रभावी रु ग्णसेवा देण्यात अडचणी भासत होत्या. या गोष्टीकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बारकाईने लक्ष देत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू केली. या अनुषंगाने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय तसेच बेलापूर येथील माता बाल रुग्णालय अशा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कॉलेज आॅफ फिजिशियन आॅफ सर्जन आॅफ मुंबई यांच्यामार्फतमान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास महापौर जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.
या रु ग्णालयांना कॉलेज आॅफ फिजिशियन आॅफ सर्जन आॅफ मुंबई येथे नोंदणीकृत करण्यात आले. त्या अनुषंगाने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाकरिता ३0 डॉक्टर्स, नेरु ळ येथील सार्वजनिक रुग्णालय व बेलापूर येथील माता बाल रु ग्णालय याकरिता ८ डॉक्टर्स तसेच
ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयाकरिता ६ डॉक्टर्स २४ तास उपलब्ध होणार आहेत. या डॉक्टर्सच्या नियुक्तीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

Web Title: City doctors will get quality healthcare, 44 doctors will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.