शहरात जनसायकल योजनेंतर्गत ४५ स्टॅण्ड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:41 AM2019-03-27T00:41:10+5:302019-03-27T00:41:23+5:30

शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे.

 In the city, there are 45 standalone available in the city | शहरात जनसायकल योजनेंतर्गत ४५ स्टॅण्ड उपलब्ध

शहरात जनसायकल योजनेंतर्गत ४५ स्टॅण्ड उपलब्ध

Next

नवी मुंबई : शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे.
शहरातील अनेक नागरिक कामानिमित्त नवी मुंबईतील विविध भागांसह उरण, जेएनपीटी आणि खारघर आदी ठिकाणी ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर टाळत पालिकेच्या जनसायकल प्रणालीतील सायकलींचा वापर करीत आहेत. सायकल योजनेतील स्टॅण्डची संख्या ४५ पर्यंत नेण्यात आली असून सुमारे ३५0 हून अधिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वाशी येथे ५ आणि सानपाडा येथे दोन सायकल स्टॅण्ड सुरू करण्यात आले असून या भागातदेखील आणखी सायकल स्टॅण्ड आणि सायकलींची मागणी वाढली आहे.
पालिकेच्या या प्रणालीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी वाशीपर्यंत स्टॅण्डची निर्मिती करण्यात आली असून वाशीपासून ऐरोलीपर्यंतही सायकली उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
२१ व्या शतकातील शहर म्हणून संबोधले जाणारे नवी मुंबई शहर पर्यावरणशील शहर म्हणून विकसित होण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक समस्येला पर्याय म्हणून कमी अंतरासाठी खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा व सायकलसारखे प्रदूषणमुक्त पर्यायाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने महापालिकेने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. शहरातील नागरिकांनीही या योजनेला पसंती दिली आहे.
पहिल्या टप्प्यात नेरुळ आणि सीवूड येथील विविध सात ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या सायकल स्टॅण्डची संख्या सानपाडा वाशीपर्यंत ४५ वर नेण्यात आली आहे. या सायकलींचा वापर प्रामुख्याने व्यायाम करण्यासाठी केला जात असून सकाळच्या वेळी स्टॅण्डवर असलेल्या सायकली अपुऱ्या पडत
आहेत.
वाशी ते ऐरोली भागातील नागरिक, सोसायट्या, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सायकलींचे स्टॅण्ड निर्माण करण्याची मागणी महापालिकेकडे केली जात आहे. नागरिकांची मागणी आणि उत्साह पाहता टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात सायकलींच्या स्टॅण्डचे जाळे पसरविण्यात येणार असून सायकलींची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे.

सीबीडीत लवकरच नवीन स्टॅण्ड
नेरु ळ, सीवूड, सानपाडा आणि वाशी भागात सुमारे ४५ हून अधिक सायकल स्टॅण्ड सुरू करण्यात आले आहेत. वाशीपासून पुढील भागात ऐरोलीपर्यंत स्टॅण्डची निर्मिती करण्यात येणार आहे.सीबीडीमध्येही अद्याप सायकल स्टॅण्ड बनविण्यात आले नसल्याने या नोडमध्ये लवकरच जनसायकल योजनेतील स्टॅण्ड बनविण्यात येणार आहेत.

Web Title:  In the city, there are 45 standalone available in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.