शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
3
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
4
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
5
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
6
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
7
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
8
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
10
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
11
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
12
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
13
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
14
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
15
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
16
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
17
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
18
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
19
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
20
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?

भंगार माफियांमुळे शहर असुरक्षित, तीन दिवसांत दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:38 PM

भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात भंगार माफियाराज डोके वर काढू पाहत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत दोन घटनांमध्ये भंगार व्यवसायाशी संबंधित चौघांच्या हत्या झाल्या आहेत. त्यामागे भंगाराच्या व्यवसायात असलेल्या मोठ्या प्रमाणातील ‘अर्थ’कारणाचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.बंद पडलेल्या कंपन्या तसेच बांधकामातून निघणारे टाकाऊ लोखंड यामुळे शहरातील भंगाराचा व्यवसाय तेजीत आहे. त्यामुळे या व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांकडून भंगार मिळवण्यासाठी कसोटीचे प्रयत्न केले जातात. त्याकरिता बंद पडत असलेल्या कंपन्यांचे स्क्रॅब उचलण्यासह, जुन्या बांधकामाच्या ठिकाणी निघणारे लोखंड उचलण्याचा ठेका मिळवण्यासाठी चढाओढ लागल्याचेही चित्र शहरात पाहायला मिळत आहे. तर अनेक भंगार व्यावसायिक राजकीय वरदहस्तावर आपला व्यवसाय टिकवून आहेत. त्यांच्याकडून कायदेशीर अथवा बेकायदेशीरपणे भंगार जमवले जाते. हे भंगार साठवण्यासाठी एमआयडीसी परिसरातील वापरात नसलेल्या कंपन्या अथवा मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या गोडाऊन तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साठवले जात आहे. स्पर्धक इतर भंगार व्यावसायिकांचे ग्राहक स्वत:कडे वळवण्यासाठी दर तोडले जातात, याच्यातून भंगार व्यावसायिकांमध्येही वाद उद्भवत असतात.मागील काही वर्षांपूर्वी पोलिसांनी भंगार माफियांचे कंबरडे मोडून काढले होते; परंतु दरम्यानच्या काळात एमआयडीसी परिसरातील भंगारचोरांवरील कारवाया थंडावल्याने भंगार माफियाराज पुन्हा डोके वर काढू पाहत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच प्रकारातून बोनसरी गावातील तिघा कामगारांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या दोन दिवसअगोदर वाशीत विजय मल्ले या भंगार व्यावसायिकाचा मृतदेह आढळून आला होता. तो गोवंडीचा राहणारा असून, भंगाराच्या व्यवसायानिमित्ताने नवी मुंबई परिसरात तो यायचा असेही समजते. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये चौघांची हत्या झाल्याने भंगार व्यवसायात सक्रिय असणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.विजय मल्ले याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अश्फाक अली जावेद शेख याला अटक केली असून, तो मानखुर्दचा राहणारा आहे. त्यांच्यात भंगाराच्या धंद्यातील पैशावरून वाद होते असेही समजते. घटनेच्या दिवशी या दोघांमध्ये आर्थिक वाद झाल्याने त्याने हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिल्याचे कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.