वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
By admin | Published: April 1, 2017 06:21 AM2017-04-01T06:21:54+5:302017-04-01T06:21:54+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांवर १ एप्रिल २०१७ पासून बंदी घातली आहे. शुक्र वार हा खरेदीसाठी शेवटचा
अलिबाग : सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांवर १ एप्रिल २०१७ पासून बंदी घातली आहे. शुक्र वार हा खरेदीसाठी शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील विविध दुचाकी वाहने विक्रीच्या शोरूममधून तब्बल साडेतीन हजार वाहनांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विविध शोरूम्सच्या मालकांनी वाहन खरेदीवर भरघोस सूट दिल्याने ग्राहकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी झाल्याने ती वाहने भंगारात जाण्यापासून वाचली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ च्या निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर १ एप्रिल २०१७ पासून बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वाहन विक्र ी करणाऱ्या शोरूम्सच्या मालकांनी वाहनांची विक्री लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्यासाठी हिरो, होंडा या कंपनीच्या वाहनांसह अन्य कंपनीच्या वाहनांवर सुमारे १५ हजारांची भरघोस सूट दिली होती. यामुळे दुचाकी विकत घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना फायदा झाला आहे. खरेदी केलेले वाहन घेऊन ग्राहकांना पेण येथील आर.टी.ओ. कार्यालयात धाव घ्यावी लागत होती.
जिल्ह्यात होंडा कंपनीच्या १२००, हिरो कंपनीच्या ७०० तर अन्य कंपन्यांच्या १३ वाहनांची शुक्र वारी
विक्र ी झाली. कधी नव्हे ते शुक्रवारी सकाळी ७ वाजताच अलिबाग शहरातील वाहन विक्र ीचे शोरूम्स ग्राहकांसाठी खुली करण्यात आले होते. वाहन विक्रीनंतर कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी नागरिकांना वेळही देण्यात आला. वाहन खरेदीदारांकडून कागदपत्रे मिळताच त्यांना वाहन नोंदणीसाठी पेण तालुक्यात पाठविण्यात आले होते. एरव्ही आपण कोणतीही गाडी घेतली की त्या नोंदणीसाठी ग्राहकांना साधारणत: १५ ते २५ दिवसांची वाट पाहावी लागायची, मात्र शुक्रवारी आरटीओ कार्यालयाने अशा कोणत्याही अटी व शर्ती न ठेवता नव्याने घेतल्या गेलेल्या सरसकट सर्वच गाड्यांची नोंदणी करून देण्यात येत होती.
दरम्यान, सकाळपासूनच वाहन विक्रीचा धंदा तेजीत असल्याने ११ वाजता शोरूम्सबाहेर नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले, त्यामुळे काही ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागत होते. याचाच फायदा घेत काही मध्यस्थ या ग्राहकांना गाडी उपलब्ध करून देत होते. त्यामुळे मध्यस्थांनी फीच्या स्वरूपात बक्कळ कमाई केली. (प्रतिनिधी)