शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

वाहन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

By admin | Published: April 01, 2017 6:21 AM

सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांवर १ एप्रिल २०१७ पासून बंदी घातली आहे. शुक्र वार हा खरेदीसाठी शेवटचा

अलिबाग : सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ वाहनांवर १ एप्रिल २०१७ पासून बंदी घातली आहे. शुक्र वार हा खरेदीसाठी शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील विविध दुचाकी वाहने विक्रीच्या शोरूममधून तब्बल साडेतीन हजार वाहनांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विविध शोरूम्सच्या मालकांनी वाहन खरेदीवर भरघोस सूट दिल्याने ग्राहकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. मोठ्या संख्येने वाहनांची खरेदी झाल्याने ती वाहने भंगारात जाण्यापासून वाचली आहेत.सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ च्या निकषांचे पालन न करणाऱ्या वाहनांची विक्री आणि नोंदणीवर १ एप्रिल २०१७ पासून बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वाहन विक्र ी करणाऱ्या शोरूम्सच्या मालकांनी वाहनांची विक्री लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्यासाठी हिरो, होंडा या कंपनीच्या वाहनांसह अन्य कंपनीच्या वाहनांवर सुमारे १५ हजारांची भरघोस सूट दिली होती. यामुळे दुचाकी विकत घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना फायदा झाला आहे. खरेदी केलेले वाहन घेऊन ग्राहकांना पेण येथील आर.टी.ओ. कार्यालयात धाव घ्यावी लागत होती.जिल्ह्यात होंडा कंपनीच्या १२००, हिरो कंपनीच्या ७०० तर अन्य कंपन्यांच्या १३ वाहनांची शुक्र वारी विक्र ी झाली. कधी नव्हे ते शुक्रवारी सकाळी ७ वाजताच अलिबाग शहरातील वाहन विक्र ीचे शोरूम्स ग्राहकांसाठी खुली करण्यात आले होते. वाहन विक्रीनंतर कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी नागरिकांना वेळही देण्यात आला. वाहन खरेदीदारांकडून कागदपत्रे मिळताच त्यांना वाहन नोंदणीसाठी पेण तालुक्यात पाठविण्यात आले होते. एरव्ही आपण कोणतीही गाडी घेतली की त्या नोंदणीसाठी ग्राहकांना साधारणत: १५ ते २५ दिवसांची वाट पाहावी लागायची, मात्र शुक्रवारी आरटीओ कार्यालयाने अशा कोणत्याही अटी व शर्ती न ठेवता नव्याने घेतल्या गेलेल्या सरसकट सर्वच गाड्यांची नोंदणी करून देण्यात येत होती.दरम्यान, सकाळपासूनच वाहन विक्रीचा धंदा तेजीत असल्याने ११ वाजता शोरूम्सबाहेर नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले, त्यामुळे काही ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागत होते. याचाच फायदा घेत काही मध्यस्थ या ग्राहकांना गाडी उपलब्ध करून देत होते. त्यामुळे मध्यस्थांनी फीच्या स्वरूपात बक्कळ कमाई  केली. (प्रतिनिधी)