१२ ग्रामपंचायतींमध्ये साफसफाई

By Admin | Published: February 8, 2016 02:47 AM2016-02-08T02:47:54+5:302016-02-08T02:47:54+5:30

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतील तिसऱ्या व अंतिम टप्प्यात पेण तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील गावांत स्वच्छता करण्यात आली

Cleanliness in 12 Gram Panchayats | १२ ग्रामपंचायतींमध्ये साफसफाई

१२ ग्रामपंचायतींमध्ये साफसफाई

googlenewsNext

वडखळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतील तिसऱ्या व अंतिम टप्प्यात पेण तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील गावांत स्वच्छता करण्यात आली. तीन टप्प्यात राबविण्यात आलेल्या या अभियानात तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता करण्यात आली. दादर, वाशी, भाल, वाशीनाका, सापोली, वरवणे, वरसाई , जीते, आंबिवली, शिरकी, धावटे, रावे, पेण, हनुमान पाडा या बैठकातील श्रीसदस्य सहभागी झाले होते.
स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत श्रीसदस्यांनी रविवारी वाशिवली, बेलावडे, वरवणे, महालमीरा, वरेडी, मळेघर, जावळी, करोटी, रोडे, कणे, दीव, निधवली या ग्रामपंचायत हद्दीतील गावात स्वच्छता अभियान राबवले.
या स्वच्छता मोहिमेतील तीन टप्प्यात ४,६२६ श्रीसदस्यांबरोबर १,१३६ ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. ४९ ग्रामपंचायतींमधील गावातून २५६ टन सुका कचरा तर ९५ टन ओला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. (वार्ताहर)

Web Title: Cleanliness in 12 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.