नेरळ : नेरळमधील विद्यामंदिर माहीम संचलित मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नेरळ परिसरात स्वच्छता अभियान राबवून जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छतेची स्वत:पासून त्यांनी सुरु वात के ली.राष्ट्रीय सेवा योजनेत या योजनेच्या वतीने टिपणीस कॉलेजच्या ५० विद्यार्थ्यांच्या गटाने नेरळ गावाच्या परिसरात शबिराचे आयोजन के ले होते. विद्यार्थ्यांनी श्रमदान करताना नेरळ पायरमाळ भागातून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नेरळ ग्रामपंचायत समोरील जिजामाता तलाव येथील परिसर स्वच्छ केले. त्याच वेळी शहरात फिरून पथनाट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मुलन, स्वच्छतेविषयी जनजागृती, स्त्रीभ्रूण हत्या, बेटी बचाव, वीज वाचवा, या विषयांवर जनजागृती करणारी पथनाट्य हुतात्मा हिराजी पाटील चौक, शिवाजी महाराज चौकात सादर केली. या वेळी अनेक कार्यक्र मांना नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नाईक, सदस्य प्रथमेश मोरे यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी नेरळ गावात आणि आदिवासी वाड्यात राबविलेल्या स्वच्छता अभियानामुळे शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिटप्रमुख प्रा. श्रमिक खरात, प्रा. सोनाली पट्टेबहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना लीडर निसार शेख, रेखा गायकर, हृषीकेश चव्हाण, भास्कर डोहिंफोडे श्रमसंस्कार शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांची नेरळमध्ये स्वच्छता मोहीम
By admin | Published: January 05, 2017 6:05 AM