महापालिकेची वाशीमध्ये स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:54 AM2018-08-30T04:54:49+5:302018-08-30T04:55:28+5:30
नागरिकांमध्ये जनजागृती : प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहन
नवी मुंबई : महानगरपालिकेने विद्यार्थी व नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. वाशी रेल्वेस्थानक, सागर विहार परिसराची साफसफाई करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. प्लॅस्टिकचा वापर न करण्याचे आवाहनही करण्यात आले.
वाशी विभाग कार्यक्षेत्रातील वाशी रेल्वेस्थानक परिसरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष स्वच्छतेबाबतची मोहीम घेण्यात आली. या वेळी स्टेशन परिसरामध्ये पथनाट्याद्वारे नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत व कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच कचºयावर प्रक्रि या करण्याबाबत व प्लॅस्टिकच्या पिशव्या व थर्माकोल न वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली, तसेच सर्व नागरिकांना प्लॅस्टिक निर्बंध बाबतची शपथ देण्यात आली. या मोहिमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त तुषार पवार, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे, स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, डी. एन. कृष्णन, रमेश वाघ, विनीता केसरकर, मुकेश शहा, एन.एस.एस.चे विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वाशी विभागतील सागर विहार येथे नवी मुंबई महानगरपालिका व फोर्टीज हॉस्पिटलच्या सहभागाने खाडीकिनारी व परिसरामध्ये विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेवेळी खाडीकिनाºयाची साफसफाई करून प्लॅस्टिकच्या पिशव्या व निर्माल्य हे खाडीमध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांना प्लॅस्टिक निर्बंधाबाबतची शपथ देण्यात आली.