ऐरोलीत विसर्जन तलावाची स्वच्छता

By admin | Published: March 27, 2017 06:30 AM2017-03-27T06:30:04+5:302017-03-27T06:30:04+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलाशयांची स्वच्छता करण्यात आली.

Cleanliness of immersion tank in Aarolat | ऐरोलीत विसर्जन तलावाची स्वच्छता

ऐरोलीत विसर्जन तलावाची स्वच्छता

Next

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जलाशयांची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील तलाव, नाले परिसरांची साफसफाई करण्यात आली. त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ-२ उपआयुक्त अंबरीश पटनिगीरे व सहा. आयुक्त तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी ऐरोली सेक्टर २० येथील विसर्जन तलाव व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आली.
प्लास्टीकच्या पिशव्या व निर्माल्य हे तलावामध्ये न टाकता ते निर्माल्य कलशामध्ये टाकण्यासंबंधी मार्गदर्शन करून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत मानवता ग्रुप, एकता ग्रुप, पतंजली ग्रुप, हास्य ग्रुप व स्वच्छाग्रही यांच्या सहकार्याने तलावाची मोठ्या प्रमाणात साफसफाई करण्यात आली. ऐरोली विभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक नितीन महाले, सम्राट कांबळे, विशाल खारकर, उप निरीक्षक गणेश राऊत, भूषण पाटील स्वच्छाग्रही व स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cleanliness of immersion tank in Aarolat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.