शहरातील प्रमुख स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मोठा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:12 AM2017-10-04T02:12:00+5:302017-10-04T02:13:11+5:30

स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा

Cleanliness of major cities, citizens and students too | शहरातील प्रमुख स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मोठा सहभाग

शहरातील प्रमुख स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मोठा सहभाग

Next

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्र म राबविण्यात आले असून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. रविवारी स्वच्छता उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख स्थळांची व्यापक प्रमाणात सफाई मोहीम राबविण्यात आली.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. यावेळी मोहिमेमध्ये ज्वेल आॅफ नवी मंबई, नेरु ळ, छत्रपती शिवाजी चौक व जागृतेश्वर मंदिर, वाशी, सेक्टर २ परिसर, सीबीडी बेलापूर, सानपाडा तलाव, तुर्भे, मुलुंड-ऐरोली उड्डाणपूल, ऐरोली अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान करून उपस्थित नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळक कॉलेजमधील एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसरात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण व स्वच्छतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विभागातील सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता उप निरीक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, स्वच्छाग्रही व नागरिक सहभागी झाले होते.
नवी मंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले. तसेच सीबीडी सेक्टर ८ बी येथील संभाजी नगर याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहाभागने स्वच्छता मोहीम राबवून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छता व कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले. या मोहिमेअंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथे महानगरपालिका शाळा क्र मांक १०३ मधील विद्यार्थ्यांमार्फत विभागामध्ये रॅलीचे आयोजन करून प्लास्टीक बंदी, कचरा वर्गीकरण याबाबत संदेश देण्यात आले. तसेच घणसोली येथील मुंब्रादेवी परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक, उपनिरीक्षक, विद्यार्थी, कर्मचारी सहभागी झाले होते.
स्वच्छतेबाबत जनजागृती
‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत प्लास्टीकचा वापर टाळा, ओला व सुका कचरा वेगळा करा, कचरा वर्गीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून जनजागृती करण्यात
आली.

Web Title: Cleanliness of major cities, citizens and students too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.