शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

रस्त्यावरील भंगार वाहनांचा स्वच्छ भारत अभियानात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 11:06 PM

पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे.

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये स्वच्छ भारत अभियानासमोर भंगार वाहनांचा अडथळा येऊ लागला आहे. मुख्य व अंतर्गत रोडवर शेकडो भंगार वाहने धूळखात पडली असून त्यांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला पडला आहे.भंगार वाहनांची सर्वात गंभीर समस्या पनवेल परिसरामध्ये आहे. प्रत्येक रोडवर व गल्लीमध्ये वापरात नसलेली वाहने उभी करण्यात आली आहेत. काही ठिकाणी एक वर्षापेक्षा जास्त काळ भंगार वाहने उभी असून ती सडू लागली आहेत. नादुरुस्त वाहनांकडे मालक फिरत नाहीत व त्यांची विल्हेवाट लावण्याची काहीही यंत्रणा महानगरपालिकेकडे नाही. पनवेल पालिकेला कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्थित यंत्रणा उभारता आलेली नाही अशा स्थितीमध्ये भंगार कोणी उचलयाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालय, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली,एमआयडीसी व इतर ठिकाणीही मोठ्याप्रमाणात रोडवर वाहनांचे सांगाडे उभे आहेत. अद्याप पालिकेने त्याचे सर्वेक्षणही केलेले नाही. यामुळे साफसफाई करण्यामध्ये अडथळे निर्माण होवू लागले आहेत. नागरिकांनी रोडवर एखादे वाहन उभे केले की वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत. पण भंगार गाड्या उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने व पोलिसांनी भंगार वाहनांचा लिलाव करावा अशी मागणीही केली जात आहे. उरण परिसरामध्येही ही समस्या गंभीर होवू लागली आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी शहरातील भंगार वाहनांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश परिमंडळ एक व दोन मधील अधिकाऱ्यांना दिले होते. या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व बेवारस वाहनांवर नोटीस लावण्यात आल्या व ती उचलून रबाळेमधील एनएमएमटी डेपोच्या जागेवर जावून उभी केली आहेत. परंतु हे भंगार ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागल्यामुळे पालिकेने सद्यस्थितीमध्येही मोहीम थांबविली आहे.>सर्वेक्षणाची गरजमहानगरपालिका प्रशासन व पोलिसांनी शहरातील भंगार वाहनांचे संयुक्तपणे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. गाडी मालक कित्येक महिने स्वत:च्या वाहनांकडे फिरकत नाहीत व एका जागेवरून हलवतही नाहीत. अशा वाहनांचा लिलाव करून रोडवरील कचरा दूर करावा अशी मागणी होवू लागली आहे.

टॅग्स :carकार