कोपरखैरणेतील उघडी डीपी महावितरणकडून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 11:52 PM2019-07-15T23:52:45+5:302019-07-15T23:52:52+5:30
कोपरखैरणेत रस्त्यालगतच्या उघड्या डीपीमधून होणारी विद्युतचोरी अखेर थांबवण्यात आली आहे.
नवी मुंबई : कोपरखैरणेत रस्त्यालगतच्या उघड्या डीपीमधून होणारी विद्युतचोरी अखेर थांबवण्यात आली आहे. त्याठिकाणी होत असलेल्या गैरप्रकाराचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणने सदर डीपी बंदिस्त करून होणाऱ्या वीजचोरीला आळा घातला आहे.
कोपरखैरणे येथील बालाजी थिएटरसमोरील मार्गावर हा प्रकार चालायचा. तिथल्या उघड्या डीपीमधून रात्रीच्या वेळी वीजचोरी केली जात होती. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेवून महावितरणने ही डीपी बंदिस्त केली आहे. सदर चोरीची वीज नेमकी कुठे वापरली जायची ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. परिसरात अनेक नवी विकासकामे सुरू असून झोपड्यांचे देखील साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे महावितरणकडून या वीजचोरीच्या प्रकाराचा उलगडा होणे आवश्यक होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत केवळ विद्युत डीपी बंद करून यापुढील वीजचोरीच्या प्रकाराला आळा घालण्यात आला आहे. ही डीपी बंद केल्यामुळे त्याठिकाणच्या पदपथावरून ये-जा करणाºया पादचाऱ्यांच्याही जीविताचा धोका टळला आहे.