नोटाबंदीने आली आठवडेबाजारात मंदी

By admin | Published: November 17, 2016 05:06 AM2016-11-17T05:06:02+5:302016-11-17T05:06:02+5:30

५०० व १००० च्या नोटा बंद केल्याने व सुट्यां पैशांअभावी मुरबाड तालुक्यातील नामांकित असलेल्या सरळगांवच्या मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शुकशुुकाट पहायला मिळत आहे.

The closure came in the eighth week of recession | नोटाबंदीने आली आठवडेबाजारात मंदी

नोटाबंदीने आली आठवडेबाजारात मंदी

Next

सरळगांव : ५०० व १००० च्या नोटा बंद केल्याने व सुट्यां पैशांअभावी मुरबाड तालुक्यातील नामांकित असलेल्या सरळगांवच्या मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शुकशुुकाट पहायला मिळत आहे.
पूर्ण तालुक्यातून या बाजारात भाजीपाला, शेतकी अवजारे, गुरे ढोरे, सुकी मच्छी, अशा अनेक वस्तु विकण्यासाठी विक्रेते येत असतात. गावखेड्यातून, वाड्यापाड्यातील रहिवासी मंगळवारच्या बाजारात येऊन पूर्ण आठवडाभर पुरेल एवढस भाजीपाला , किराणा सामन घेवून जातात. बाजारात ओतूर, जुन्नर, आळेफाटा, नाशिक येथून ही भाजीपाला विक्रीस येत असल्याने स्वस्त व चांगल्या दर्जेचा मिळतो. परंतु ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्याने या बाजारात सुट्टे पैसे नसल्याने बाजारत भाजीपाली किंवा कोणतीच खरेदी करु शकत नाहीत. दुकानदारही ते नाही. यामुळे बाजारात शुकशुकाट पहायला मिळत आहे. या अगोदर बैल बाजारात लाखो रु पयाची उलाढाल व्हायची. परंतु, पाचशे व हजार रु पयांच्या नोटा बंद झाल्यामुळे शेतकरी आपली गुरे विकण्यासाठी बाजारातच आणत नाहीत. त्यामुळे या बैल बाजारातही शुकशुकाट पहायला मिळत आहे.
३५ ते ४० किलोमीटर अंतरावरु न शेतकरी, आदिवासी कोंबडी, भाजीपाला विकण्यासाठी आणत असतात व ते विकून लागणारा किराणा, भाजीपाला घेऊन जातात. परंतु सुटे पैसे नसल्यामुळे बाजारातच गर्दी नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्याच बरोबर बाजारात मालाचा मोठा साठा घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. (वार्ताहर)

Web Title: The closure came in the eighth week of recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.