भेसळीसाठी साठविलेला सव्वादोन कोटींच्या लवंग जप्त

By नारायण जाधव | Published: August 24, 2023 07:50 PM2023-08-24T19:50:40+5:302023-08-24T19:50:47+5:30

अन्न व औषध प्रशासनाची एपीएमसी मार्केटमध्ये कारवाई

Cloves worth 152 crores stored for adulteration seized | भेसळीसाठी साठविलेला सव्वादोन कोटींच्या लवंग जप्त

भेसळीसाठी साठविलेला सव्वादोन कोटींच्या लवंग जप्त

googlenewsNext

नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथील एका कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर व लवंग पावडर तयार करण्यासाठी व लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा १,६०,१११ किलो साठा जप्त केला आहे. जप्त साठ्याची एकूण किंमत २ कोटी २४ लाख १५ हजार ५४० रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

जप्त केलेला साठा मे. जी. टी. इंडिया प्रा. ली., शॉप नं. बी-५१, एपीएमसी मार्केट, वाशी या आस्थापनेचा असल्याचे उघडकीस आले. हा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या साठ्यातून लवंग कांडीचे ७ नमुने विश्लेषणासाठी घेलेले आहेत. अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी विभागाचा कार्यभार घेताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगाने कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार खडके, राहुल ताकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Cloves worth 152 crores stored for adulteration seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.