नाईक यांच्यावर आमचा डोळा होता, पण योग येत नव्हता - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 08:36 PM2019-09-11T20:36:19+5:302019-09-11T20:36:41+5:30
गणेश नाईक यांच्यावर आमचा डोळा होता. परंतू योग येत नव्हता. अखेर तो योग आला आणि गणेश नाईक हे भाजपात दाखल झाले.
नवी मुंबई - गणेश नाईक यांच्यावर आमचा डोळा होता. परंतू योग येत नव्हता. अखेर तो योग आला आणि गणेश नाईक हे भाजपात दाखल झाले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढली आहे. राज्याच्या विकासात त्यांच्या अनुभवाचा नकीच फायदा होील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी मुंबई: राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री यांच्यासह त्यांचे पूत्र माजी खासदार यांनी 48 महापालिकेतील नगरसेवक आणि आपल्या हजारो समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होत्या. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, महापौर जयवंत सुतार, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर , खासदार कपील पाटील, किरीट सोमय्या , आ.संजय केळकर , आ.निरंजन डावखरे, किसन कथोरे, नरेंद्र पाटील, जगनाथ पाटील , ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले. ठामपा नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार,भरत चव्हाण , जिल्हा बैंकेचे उपाध्यक्ष भाऊ कु-हाडे, मुंबई बॅकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.
गणेश नाईक यांच्या प्रवेशाने भाजपला अधिक बलकटी मिळाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा राज्याच्या विकासाला नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
पंधरा वर्षे सत्तेत होतो. मंत्री होतो. पण येथील प्रकल्रग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न सोडवू शकलो नाही, याची नेहमीच खंत राहिल. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासह इतर काही प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीच मी आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रतिपादन गणेश नाईक यांनी यावेळी केले. याप्रसंगी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा गौरव केला.
यावेळी नवी मुंबईसह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी नाईक यांच्यासह भाजपात प्रवेश केला...