पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील युतीची शक्यता धूसर होत चालली आहे. महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यापासून सर्वांचे लक्ष प्रमुख पक्ष म्हणून ओळखले होणारे भाजपा, शिवसेना या दोन पक्षाकडे लागले आहे. भाजपा शिवसेनेला योग्य त्या प्रकारे सन्मान देत नसल्यामुळे शिवसेनेच्या गोटात स्वबळाची चर्चा सुरू आहे. पनवेल महानगरपालिकेचे प्रारूप तसेच आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरूवातीलाच पनवेल महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीला बरोबर घेवून महापालिका निवडणूक लढविण्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९ जून रोजीच या आघाडीला मान्यता दिली आहे. काँग्रेसचे सध्या तळ्यात आणि मळ्यात असले तरी एकूण परिस्थिती विचार घेता त्यांना या दोनही पक्षाच्या सोबत जावे लागणार आहे.
युतीची शक्यता धूसर ?
By admin | Published: January 02, 2017 6:30 AM