‘कोल्ड प्ले’मुळे चक्का जाम

By नामदेव मोरे | Updated: January 23, 2025 10:01 IST2025-01-23T09:59:13+5:302025-01-23T10:01:00+5:30

Cold Play: ‘कोल्ड प्ले’च्या शेवटच्या दिवशीही सायन-पनवेल महामार्गाबरोबरच नेरूळ, शिरवणे, जुईनगरच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता.

'Cold Play' causes massive traffic jam | ‘कोल्ड प्ले’मुळे चक्का जाम

‘कोल्ड प्ले’मुळे चक्का जाम

- नामदेव मोरे
नवी मुंबई -  ‘कोल्ड प्ले’च्या शेवटच्या दिवशीही सायन-पनवेल महामार्गाबरोबरच नेरूळ, शिरवणे  जुईनगरच्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्त ठेवला होता. परंतु, अंतर्गत रस्त्यांवर काहीच व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. १ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अनेकांना एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. 

डॉ. डी. वाय. पाटील मैदानामध्ये तीन दिवस कोल्ड प्लेचे आयोजन केले होते. मंगळवारी रात्री १० वाजता कार्यक्रम संपल्यानंतर ५० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांचा लोंढा मैदानाबाहेर आला. यामुळे सायन-पनवेल महामार्ग, नेरूळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, शिरवणे गाव, जुईनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात चक्का जाम झाला होता. 

बेशिस्त वाहनचालकांमुळे त्रास
कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांनी, रिक्षाचालकांनी शिरवणे गावातील अंतर्गत रस्त्यावरून नेरूळ स्टेशन व जुईनगर स्टेशनकडे जाण्यास सुरुवात केली. त्यांच्या मागून खासगी वाहनेही वसाहतीअंतर्गत रस्त्यावर आली. 

यामुळे  अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली. वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत असल्यामुळे कोंडीत भर पडली होती. रात्री कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार व कारचालकांनाही या कोंडीत अडकून पडावे लागले. शिरवणे गावासह राजीव गांधी उड्डाणपुलावरही वाहतूक ठप्प होती.  

कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी नेरूळ, शिरवणे, जुईनगर व संपूर्ण नवी मुंबईमधील नागरिकांना वेठीस धरले होते. मंगळवारी रात्री १० पासून ते दीड वाजेपर्यंत अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडी होती.  
रवींद्र सावंत, प्रवक्ते नवी मुंबई काँग्रेस

Web Title: 'Cold Play' causes massive traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.