विसर्जन मिरवणुकीला सहकार्य करा

By admin | Published: September 15, 2016 02:28 AM2016-09-15T02:28:54+5:302016-09-15T02:28:54+5:30

अनंत चतुर्दशीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० सार्वजनिक, ३५०० खाजगी गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे .

Collaborate with the immersion rally | विसर्जन मिरवणुकीला सहकार्य करा

विसर्जन मिरवणुकीला सहकार्य करा

Next

पनवेल : अनंत चतुर्दशीला पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० सार्वजनिक, ३५०० खाजगी गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे . यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० सार्वजनिक व ३५०० खाजगी गणपतींचे विसर्जन होणार आहे. बल्लाळेश्वर तलाव पनवेल येथे विसर्जनाचा मार्ग १. विसावा हॉटेल ते लाइन आळी मार्गे आदर्श हॉटेल चौक ते बल्लाळेश्वर तलाव. २.आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक, आदर्श हॉटेल चौक ते गावदेवी मंदिर मार्गे बल्लाळेश्वर तलाव. ३. आदर्श हॉटेल चौक ते विरु पाक्ष मंदिर ते जुने पोस्ट ते बल्लाळेश्वर तलाव तालुका पोलीस ठाणे, गोखले हॉल, जय भारत नाका, रतन टॉकीज, वाल्मीकीनगर, परदेशी आळी मार्गे बल्लाळेश्वर तलाव. ४. विरु पाक्ष मंदिर, कापड गल्ली ते जय भारत नाका रतन टॉकीज ते सावरकर चौक मार्गे बल्लाळेश्वर तलावाकडे मिरवणूक जाणार आहे. मिरवणुकीतील रिकामी वाहने व्ही.के. हायस्कूलचे पटांगणात उभी केली जाणार आहेत.
वडघर खाडी येथील तलावाकडे १. विरु पाक्ष मंदिर, कर्मवीर चौक ते बँक आॅफ महाराष्ट्र ते टपाल नाका ते उरण नाका. २. मिरची गल्ली ते टपाल नाका. ३. शिवाजी चौक ते पंचरत्न चौक ते उरण नाका मार्गे वडघर खाडी येथे गणेश मूर्तींची मिरवणूक जाणार आहे. या मार्गातील सोसायटीतील नागरिकांनी वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी आपली वाहने वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह व सरस्वती हायस्कूलच्या मैदानात पार्क करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Collaborate with the immersion rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.