उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानात ३ टन कचऱ्याचे संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 03:16 PM2023-08-08T15:16:13+5:302023-08-08T15:17:25+5:30

विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग

Collection of 3 tonnes of waste in the cleanliness drive in Uran municipality area | उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानात ३ टन कचऱ्याचे संकलन

उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानात ३ टन कचऱ्याचे संकलन

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरातील विविध ठिकाणी नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.

या स्वच्छता अभियानात उरण शहरातील सर्वोदय वाडी, नगर परिषद कार्यालय परिसर ,विमला तलाव , तहसील कार्यालय परिसर ,तुंगेकर बालोद्यान या ठिकाणी सफाई करण्यात आली. स्वच्छता अभियानात एकूण ३ टन कचरा उचलण्यात आला. 

या स्वच्छता अभियानात  उरण तहसीलदार डॉ .उद्धव कदम ,उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  निकम, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखापाल सुरेश पोसतांडेल, नगर रचनाकार सचिन भानुसे , बांधकाम अभियंता झुंबर माने ,जनार्दन कासारे , माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगर सेवक कौशिक शहा , प्रसाद मांडेलकर आदी मान्यवर आणि उरण नगर परिषद शाळा क्र १,२,३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी श्रमदानात सहभागी झाले होते.

Web Title: Collection of 3 tonnes of waste in the cleanliness drive in Uran municipality area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.