प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 01:52 AM2019-06-25T01:52:46+5:302019-06-25T01:53:00+5:30

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

Combined fight for project related problems, commitment of all-round public representatives | प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची ग्वाही

प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी एकत्रित लढा उभारणार, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची ग्वाही

Next

पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन प्रकल्पग्रस्तांसाठी लढा उभारण्याची ग्वाही यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.
दि.बा. पाटील यांनी आपले आयुष्य लोकांच्या सेवेसाठी खर्च केले. सतत ते प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढले, त्यांचे काम पुढे नेण्याच्या दृष्टीने कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने २५ जणांची सर्वपक्षीय कोअर कमिटी स्थापन झाली असून त्याला अनुसरून किमान १0५ जणांची सहकमिटी गठीत करण्यात येणार आहे. मुख्य कोअर कमिटीचा अध्यक्ष ही नुसती निवड नाही तर मोठी जबाबदारी मी समजतो. नुसती भाषणे करून चालणार नाही तर कमिटीत असल्याची जाणीव ठेवून सर्वांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे असे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी, लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य जवळून पहायला मिळाले आणि त्यांच्या चळवळीत सहभाग घ्यायला मिळाले त्याबद्दल ऋ णनिर्देश केले. २0१५ पर्यंतची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. दुर्दैवाने काही संघटना न्यायालयात गेल्या व त्या निर्णयाला स्थगिती आली असल्याचे सांगितले. विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले पाहिजे ही माझी भावना असून त्यासाठी पाठपुरावाही करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील यांनी दिबांना श्रद्धांजली वाहत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांनी सोडविणे गरजेचे आहे. अद्यापही एकही घर सिडकोने नियमित केले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली तसेच प्रकल्पग्रस्तांची घरे आहेत त्या स्थितीत नियमित केली पाहिजेत असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, आमदार मनोहर भोईर, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, पांडुशेठ घरत, आमदार बाळाराम पाटील, जे. डी. तांडेल, सुधाकर पाटील, संतोष पवार, श्रुती म्हात्रे, सुरेश ठाकूर, रवी पाटील, विजय गडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्र मास महापौर डॉ. कविता चौतमोल, दिबांचे चिरंजीव अभय पाटील, अतुल पाटील, चेतन साळवी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरु णशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, शैक्षणिक, सामाजिक, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Combined fight for project related problems, commitment of all-round public representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.