पुढच्या वर्षी लवकर या... उरणमध्ये ३०२६ गौरी-गणपतींचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:20 PM2022-09-05T19:20:51+5:302022-09-05T19:22:26+5:30
३०२६ गौरी - गणपतींना सोमवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३०२६ गौरी - गणपतींना सोमवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सार्वजनिक, ७५० खासगी गणपती आणि २५० गौरींचे, न्हावा-शेवा बंदर ठाण्याच्या हद्दीतील एक सार्वजनिक, १३१९ गणपती, १९६ गौरी आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८८ घरगुती, २० गौरी अशा एकूण उरण परिसरात तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३०२६ गौरी -गणपतींचे सोमवारी विसर्जन करण्यात आले.यामध्ये ३ सार्वजनिक, खासगी-२५५७ गणपती तर ४६६ गौरींचा समावेश होता.
गौरी-गणपतींच्या विसर्जनासाठी सोमवारी दुपार पासूनच मिरवणुकीला वाजतगाजत सुरुवात झाली होती. घारापुरी, मोरा, माणकेश्वर, पीरवाडी, करंजा खोपटा, माणकटोक, न्हावा-खाडी आदी समुद्र- खाड्या किनारी आणि शहरातील विमला, भवरा तसेच तालुक्यातील विविध गावातील तलावात भावपूर्ण वातावरणात शांततेत विसर्जन करण्यात आले.
यावेळी न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील, मधुकर भटे, अभिजित मोहिते यांच्यासह पाच पोलिस निरीक्षक,१४ उपनिरीक्षक आणि १२५ पोलिस कर्मचारीही चोख बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.