उज्ज्वल भविष्यासाठी साथ द्या
By admin | Published: May 16, 2017 12:52 AM2017-05-16T00:52:48+5:302017-05-16T00:52:48+5:30
पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत चांगल्या वर्तमानाबरोबरच भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी भाजपाला नव्हे विकासाला
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत चांगल्या वर्तमानाबरोबरच भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी भाजपाला नव्हे विकासाला साथ देण्याचे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. येथील प्रभाग १४ व १९ मधील जनसंपर्ककार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यास भाजपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.
महापालिकेत भाजपाची सत्ता असेल असे मत यावेळी रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील पनवेलकरांना विकास यात्रेत सहभागी होत विकासाच्या आड येणाऱ्यांवर मात करण्याची गरज असल्याचे विचार मांडले. उपस्थितांमध्ये पीआरपीचे नेते जगदीश कवाडे, महेश साळुंखे, श्रीनंद पटवर्धन, प्रभाग १९ चे उमेदवार परेश ठाकूर, राजू सोनी, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.