आयुक्तांनी आरोग्य विभागाला घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:55 PM2020-10-01T23:55:25+5:302020-10-01T23:55:33+5:30

दफ्तरदिरंगाईविषयी नाराजी : नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

The commissioner took the health department to task | आयुक्तांनी आरोग्य विभागाला घेतले फैलावर

आयुक्तांनी आरोग्य विभागाला घेतले फैलावर

Next

नवी मुबई : कोरोनाशी लढाई करताना आरोग्य विभाग सदैव दक्ष असला पाहिजे. प्रत्येक काम नियमाप्रमाणे व वेळेतच झाले पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये दफ्तरदिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. नियमबाह्य काम करणाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी अधिकाºयांना दिला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची विशेष बैठक आयुक्तांनी गुरुवारी संध्याकाळी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कोरोनासंदर्भातील सर्व कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सद्य:स्थितीमध्ये कामामध्ये विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. युद्धजन्य परिस्थिती आहे. सर्वांनी दक्ष असले पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. औषध खरेदीकडे दुर्लक्ष करू नये, अशा सूचनाही दिल्या.

शहरवासीयांना दर्जेदार सुविधा देण्यास मनपा कटिबद्ध आहे. परंतु यासाठीच्या कामामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. खरेदी प्रक्रियेमध्ये कोणत्याही नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला. उपलब्ध होणारे साहित्य, उपकरणे यांच्या दर्जा आणि गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड करू नये. गुणवत्ताहीन साहित्य देणाºया पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. वेळ पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले.

कामात सुधारणा करावी
च्खरेदी केल्या जाणाºया साहित्य व उपकरणांच्या किमती बाजारभावाशी सुसंगत असाव्यात याकडेही काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तातडीची गरज लक्षात घेऊन कामात सुधारणा करावी. अतिरिक्त
आयुक्त (२) यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर काटेकोरपणे लक्ष द्यावे व कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

Web Title: The commissioner took the health department to task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.