नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील आयटी, बँकिंग व इतर अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कंपन्यांनी कोरोना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, सुरक्षेसाठी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिला आहे.कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना फार्मासिटीकल, बँकिंग, आय.टी. सेक्टर, डाटा सेंटर अशा अत्यावश्यक सेवा पुरविणारे उद्योग व आस्थापने लॉकडाउनच्या काळातही सुरू आहेत. कंपन्यांनी एकूण क्षमतेच्या १० टक्के कर्मचारी कामावर घेऊन काम सुरू ठेवण्यास शासन निर्णयानुसार परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कामकाजाच्या ठिकाणी कँटीन, कॅफेटेरिया परिसरात एकमेकांपासून किमान तीन मीटरचे अंतर राखून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकांसह कार्यरत कर्मचाºयांची राहण्याची व्यवस्था कंपनी आवारातच करणे आवश्यक राहील. दिवसातून तीन वेळा परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक राहील. यामध्ये दरवाजांचे हॅण्डल्स, नळाचे टॅप, संगणक, की बोर्ड, माउस, फ्लश टँकचे नॉब अशा जिथे अनेक व्यक्तींचा वारंवार स्पर्श होतो, अशा विविध गोष्टींचाही समावेश आहे. कर्मचाºयांनी तीनपदरी मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, हॅण्ड सॅनिटायझर वापरणे गरजेचे असल्याचे निर्देशात नमूद करण्यात आले आहे.कर्मचाºयांना पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी दिला.>तत्काळ माहिती देणे बंधनकारकएखाद्या कर्मचाºयाला ताप, घशात खवखव, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारची लक्षणे जाणवू लागल्यास महापालिका नागरी आरोग्यकेंद्रास कळविणे आवश्यक आहे. कंपनीसाठी कच्चा माल पुरवणाºया वाहनांना परिसरात ठरावीक अंतरापर्यंतच प्रवेश द्यावा. त्यापुढे प्रवेश देणे अगदी आवश्यक असल्यास निर्जंतुकीकरण करूनच वाहनास प्रवेश द्यावा. कर्मचाºयांना कंपनी परिसरातच शिजवलेले खाद्यपदार्थ देणे व बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास प्रतिबंध करावा, अशा सूचना दिल्या आहेत.